EntertainmentNews

१६ जानेवारी रोजी संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर : स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने  संस्कृत  लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा महोत्सव संस्कृतभारती प्रचार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून हे यंदाचे तिसरे वर्ष आहे.  महोत्सवाचे आयोजन  १६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (प.) येथे  करण्यात येणार आहे.

लघुपट तयार करताना स्पर्धकांनी लघुपटाचा कालावधी १० मिनिटांशिवाय अधिक असू नये, याची खबरदारी घ्यायची आहे.   लघुपट पूर्णपणे संस्कृत भाषेतच तसेच  चालू घडामोडींवर आधारित असावा. माहितीपट ग्राह्य धरला जाणार नसून  पॅनलमधील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चित्रपटातील कन्टेन्ट  किंवा रॉयल्टी संबंधित कोणत्याही विवादांसाठी सहभागी स्पर्धक  पूर्णपणे जबाबदार असतील, याची स्पर्धकांनी कृपया नोंद घ्यावी.  व्हिडिओ १० डिसेंबर २०२१ पूर्वी पाठविण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. महोत्सवातील लघुपटाचा निकाल  १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात घोषित केला जाईल. प्रथम ३ लघुपटांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  इच्छुक आपले नाव https://forms.gle/vpK4h1Kpg97m8vwZA या लिंकवर नोंद करू शकतात. नोंदणी फी १०० रुपये असून A/C No. : 020110100006451
A/C Type : SB, IFSC code: TJSB0000020, A/c Name : SAMSKRITA BHARATI (KONKAN), Branch : Dombivli ( East ), Thane Janata Sahakari Bank Ltd या बँक खात्यावर पैसे जमा करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी  महेश परळकर  (9769545758) यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top button