Opinion

.. हिंदू सणांचे पावित्र्य राखावेच लागेल !

ज्या हिंदूंच्या पैशांवर बाजारात तेजी आहे. ज्यांच्या खरेदीमुळे आपण अधिकाधिक मालामाल होतोय, त्याच हिंदू धर्माच्या संस्कृतीला, सभ्यतेला लक्ष्य करून त्यावर जाहिराती बनवणाऱ्या ब्रॅंड्सचा सुळसुळाट झाल्याचे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक क्रियाशील ग्राहक हा हिंदू आहे. हिंदूंचे उत्सव, संस्कृती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. असे असतानाही प्रत्येक वेळी भारतीय कॉर्पोरेट संस्था हिंदूंच्या उत्सवांवर, संस्कृतीवर वेळोवेळी घाला घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे डाबर इंडिया. डाबर इंडियाने आपल्या एका जाहिरातीमध्ये एक समलिंगी जोडप्याला ‘करवा चौथ’ चा सण साजरा करताना दाखवून, हिंदूंच्या सनातन परंपरांना छेद देऊनही आम्ही आमचे उत्पादन अखेर हिंदूंनाच विकतो, हाच संदेश दिला आहे. असे केवळ डाबर इंडियानेच केले नाही तर सीएट पासून फॅब इंडियापर्यंतच्या सर्व हिंदुद्वेष्ट्या कंपन्या हेच करत आहेत आणि हे असे उद्योग करताना त्यांना काही वाटतही नाही, याचे कारण म्हणजे आपला हिंदू समाज या किंवा अशा अशाप्रकारच्या घटनांना एकमताने पुढे येऊन प्रतिकार करत नाही, किंवा त्याला प्रतिउत्तर देत नाहीत.

हिंदू संस्कृतीवर कशाप्रकारे घाला घातला जात आहे, हे पाहण्यासाठी या जाहिरातीतील बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजेत. अति उदारमतवादी धोरण राबविण्यासाठी या जाहिरातीत करवा चौथनिमित्त दोन समलैंगिक महिला हा सण साजरा करतानाचा एक प्रसंग चित्रित करण्यात आला होता. करवा चौथ हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो, या जाहिरातीतून पती (पुरुष) हटवण्यात आला आहे. या जाहिरातीत करवा चौथची परंपरा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली असून हिंदू सण जाहिरातीत दाखविताना त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता डाबर इंडियाला वाटली नाही का? हा प्रश्न उपस्थित राहतो.

यापूर्वी फॅब इंडियाने दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ मोहीम सुरू केली, दिवाळीची खिल्ली उडवली आणि तिचे उर्दूकरण करण्याचा प्रयत्न केला. कपड्यांच्या संग्रहाच्या जाहिरातीमध्ये कंपनीने दिवाळीला जश्न-ए-रिवाज असे म्हटले होते. हिंदू धर्माला लक्ष्य बनविण्याचे काम यापूर्वी रेड लेबल, सिप्ला, तनिष्क ज्वेलर्स, इ कंपन्यांनीही केला असून यात सीएट टायर्सचासुद्धा समावेश झाला आहे. सीएटने सुद्धा दिवाळीच्या तोंडावर हिंदूंना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. सीएट टायर्सच्या जाहिरातीमध्ये आमिर खान रस्त्यावर फटाके फोडत असलेल्या मुलांना म्हणतो, की रस्ता हा येण्या-जाण्यासाठी असतो; फटाके फोडण्यासाठी नाही. आता या म्हणण्याचा आणि टायरच्या जाहिरातीचा काहीच संबंध नाही; तरीसुद्धा हिंदू धर्माला, त्याच्या परंपरांना बदनाम करण्यासाठी मुद्दामहून असे प्रकार केले जातात.

तनिष्क ज्वेलर्सने आपल्या जाहिरातीमधील मॉडेलला मुघलकालीन कानातले घालून तसेच कपाळावर बिंदी न लावता प्रस्तुत केले आहे. मुस्लिम पद्धतीचा तिचा अवतार हिंदूंच्या सणांच्या जाहिरातींसाठी का दाखविण्यात यावा, हे न उलगडलेले कोडेच आहे.

सीएट टायर्सला जर काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी जाहिरात बनवायची होती, तर रस्त्यावर नमाज पढणे, मशिदींवर भोंगे लावून लोकांची झोपमोड करणे आणि त्यांच्या दैनंदिन कामांत अडथळा आणणे, ईदला प्राणिबळी देणे, इ. विषय घेऊनसुद्धा जाहिरात बनवता आली असती; पण त्यांना केवळ हिंदूंच्याच संस्कृतीवर घाला घालायचा आहे. अल्पसंख्य म्हणवल्या जाणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मियांनी अशा जाहिराती खरेतर सहनच केल्या नसत्या. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील, असे काही करण्याची ते हिंमत करणार नाहीत. हिंदू बहुसंख्य असूनसुद्धा, त्यांच्या अतिसहिष्णू, अतिसज्जन स्वभावामुळे ते केवळ या जाहिराती स्वीकारतात असे नव्हे, तर या कंपन्यांची उत्पादनेसुद्धा विकत घेतात. असे करून आपण आपल्याच धर्माचे नुकसान करत आहोत, याची त्यांना जाणीव नसते. हिंदूंनी जर ठरवून बहिष्कार घातला, तर या कंपन्यांना व्यवसाय करणे अशक्य होईल, हे अगदी साध्या सांख्यिकी माहितीवरून कोणालाही समजू शकेल.

फटाके वाजवावेत कि नाही, कशाप्रकारे वाजवावेत, इ.मुद्दे चर्चेचा विषय होऊ शकतात; पण इतर कोणत्याही धर्मातील रूढींविषयी भाष्य न करता, केवळ हिंदू धर्मातील रुढींवर टीका करायची, हे प्रकार काही नवे नाहीत.लेखाच्या सुरुवातीला ज्या कंपन्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनीसुद्धा अनेकदा हिंदू धर्माला लक्ष्य केले आहे. रेड लेबल या चहाच्या कंपनीने तर, तीन जाहिरातींमध्ये हिंदू माणूस कसा संकोची स्वभावाचा असतो, इतरांशी जुळवून घेत नाही वगैरे दाखवले आहे. खरे म्हणजे, हिंदू संस्कृतीच या जगातील सर्वांत उदार आणि सहिष्णू संस्कृती आहे, हे दाखवून द्यायचे झाले तर, बरीच उदाहरणे देता येतील. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, युधिष्ठिराला जसे सर्व मनुष्यांमधे फक्त सद्गुणच भरलेले दिसत, तसे, हिंदू समाजालासुद्धा आपल्या हितशत्रूंमध्ये काही वाईट दिसत नाही. या अशा जाहिराती हिंदू माणसाला सर्वधर्मसमभावाचे प्रतीक वाटतात. वस्तुतः, मुस्लिम, ख्रिश्चन, इ. धर्मांमध्ये अनेक कुरीती आहेत आणि नवीन कुरीती तयार होत आहेत; पण त्यावर मात्र कोणी जाहिराती बनवत नाहीत. कोणी जर हे प्रश्न उठवू लागला, तर स्वतःला पुरोगामी किंवा सेक्युलर म्हणवणारे लोक त्याला ‘कट्टर’, ‘असहिष्णू’ अशी नावे ठेवतात.

हिंदू संस्कृतीमध्ये सहिष्णुता आहे. हिंदू संस्कृतीच्या चालीरीती परंपरेने चालत आल्या आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण हिंदूंच्या याच सणांमध्ये महाशिवरात्रीमध्ये दूध वाया न घालविण्याचे सल्ले दिले जातात. होळीमध्ये पाणी वाचविण्याची आठवण केली जाते. ख्रिसमस आणि पाकिस्तानच्या विजयावेळी मोठ्या प्रमाणावर वाजणारे फटाके हा त्यांच्यासाठी उत्सव असतो, पण दिवाळीच्या वेळी याच फटाक्यांमुळे प्रदूषण होते. प्रत्येक हिंदू परंपरा आणि सण खरे तर हिंदुद्वेष्ट्यांसाठी एक बाधा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

ईदच्या वेळी कधी बिग बिलयन सेल वगैरे लागलेले आपल्या ऐकिवात नाही. पण दिवाळीत काही तासांतच फ्लिपकार्ट सहा कोटींच्या सामानाची विक्री करतो. खरे सांगायचे तर हिंदूंना आपली ताकद ओळखता आलेली नाही. आपली ताकद ओळखण्यासाठी जरा उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि, भारतात सणासुदीचा काळ सुरु होताच आर्थिक मरगळ दूर झाली. सप्टेंबर महिन्याचे बाजारपेठेत उसळी मारणारे आकडे जगाला अचंबित करणारे आहेत. हे आकडे ख्रिसमस किंवा रमझान मुळे वाढलेले नाहीत. सांगण्यात येत असलेल्या अनुमानानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेला दिवाळी नंतर आणखी बळकटी प्राप्त होणार आहे. इलेक्ट्रॉनिक बाजार तेजीत आहे. फेस्टिवल ऑफर, दिवाळी ऑफर सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.

हिंदू कुटुंबियांची ताकद ही त्यांच्या बचतीची ताकद आहे. यापेक्षाही त्याची मोठी ताकद ही त्याची क्रय शक्ती आहे. यामुळे खरेदीची त्यांची क्षमता अग्रस्थानी असते. आणि सण-उत्सवांमध्ये सुद्धा सर्वाधिक हिंदूंच्या कमाईचा पैसा दिवाळीत बाजारात जातो. मग? याच बाजाराला हिंदू सण, प्रतीके, आस्थाचिन्हे, परंपरांचा सन्मान करायला नको का? डाबर, सीएट, फॅब इंडिया, सर्फ एक्सेल सारख्या अनेक ब्रँड्स आमच्या धर्म, परंपरा, रीति-रिवाज, सणांची खिल्ली उडवून आम्हालाच त्यांचे सामान विकतात. हिंदूंच्या पैशांवर धनदांडग्या झालेल्यानी हिंदू धर्माच्या खरेदीची ताकद ओळखायला हवी. त्यांना जर त्यांचे सामान विकायचे असेल, तर आमच्या परंपरांचा, संस्कृतीचा, उत्सवांचा सन्मान त्यांना करायलाच हवा.

Back to top button