Opinion

बनावट लसीकरण प्रमाणपत्र रॅकेटमागे असामाजिक तत्व? दुर्लक्ष करून चालणार नाही…

दीड वर्षाच्या प्रदीर्घ करोना संघर्षानंतर आता ओमीक्रोनचा धोका गंभीर होत असताना अवघ्या महाराष्ट्राची शरमेने मान खाली जाईल असे एकापाठोपाठ एक विविध शहरात बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळ्यांचे समाजविघातक धंदे समोर येऊ लागले आहे. यामुळे समाजमनात तीव्र प्रतिक्रिया उठताना दिसत आहे. नवी मुंबई, मुंब्रा, कुर्ला, घाटकोपर, औरंगाबाद, आणि आता धुळे शहरातही असे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळ्यांना पोलीस प्रशासनाने कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकीकडे संपूर्ण जग करोनाच्या संकटाने ग्रासले असताना काही लोक दोन ते तीन हजार रुपयात बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र बनवून देत आहेत. राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशात या टोळ्यांचे कारनामे सुरू असण्याची दाट शक्यता आहे.

कुठे कुठे झाली कारवाई?

घाटकोपर: कोविड लसीचा एकही डोस न घेता प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा कुर्ला पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपी जुबेर शेख (वय 19) व अल्फेझ खान (वय 19) यांना पोलिसांनी अटक केली. दोघेही मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत.

कांदिवली: कोरोना प्रतिबंधक लसच्या नावाखाली आम्हाला बनावट लस टोचली, असा धक्कादायक दावा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील 390 जणांनी केला.

नवीमुंबई: नवी मुंबईच्या एपीएमसी भागात बनावट करोना लस प्रमाणपत्र विकल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. तीन हजार रुपयांना ते प्रमाणपत्र विक्री करत होते.

ठाणे: ठाण्यातही दहिघर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी करोना लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या धाडीत आरोपिकडून दिवसाला 100 हुन अधिक लोकांना प्रमाणपत्र देत असल्याची माहिती समोर आली.

औरंगाबाद_परिवहन कार्यालय: शेख मिनाज, शेख अशफाक व अनान मुजीब बेग हे परिवहन कार्यालयातील कामासाठी कोविड लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोघांकडून लॅपटॉप, मुद्रण यंत्र व बनावट प्रमाणपत्रासह साडे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

औरंगाबादघाटीरुग्णालय: जिन्सी पोलीसांनी 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. या टोळीने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले तसेच, फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांनाही अटक केली. तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या. म्हणजे महिलांचाही सहभाग या टोळ्यांमध्ये आहे.

औरंगाबाद_आरटीओ: आरटीओ एजंट नी दोनशे ते पाचशे रुपये घेऊन हजारो बनावट लस प्रमाणपत्र वाटप केल्याचे सामोर आले. या प्रसंगी आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करत शेख मिनाजुद्दीन व अदनान मुल्ला मुजीब बेग या दोघांना अटक केली. दोघे आरोपी दिवसाला शंभरहून अधिक बनावट प्रमाणपत्र तयार करून देत होते, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.

वैजापूर: करुणा ची लस घेतलेली नसतानाही 600 ते 1000 रुपये घेऊन दोन्ही घेतल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन आरोग्य सेविकांना निलंबित करण्यात आले आहे वैजापूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला डॉ. मोहिनुद्दीन शेख, आरोग्य सेविका उषा आढाव, कंत्राटी आरोग्य सेविका शहनाज शेख या आरोपींवर कारवाई झाली.

धुळे: महापालिकेच्या आरोग्य विभागानेच पैसे घेऊन तब्बल 50 हजार लोकांना बनावट प्रमाणपत्र बनवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळ्यातील मुस्लिम बहुल भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच नोंद झालेल्या लसी काळ्या बाजारात विकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फिल्म कंपनी: टिप्स इंडस्ट्रीचे(Tips Industries) मालक रमेश तौरानी यांनी त्यांच्या मुंबईमधील कंपनीच्या जवळपास 365 कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली होती. मात्र आपल्याला खोटी लस देण्यात आल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. आम्हाला कोव्हिशिल्ड लस म्हणून साधारण: स्टिरॉइड वॉटर देण्यात आले असावे,असे रमेश तौरानी यांनी सांगितले.

मागील महिनाभरात समोर आलेली ही प्रकरणे अतिशय गंभीर आहेत. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेशी याचा थेट संबंध आहे. मुस्लिम समाजात जेव्हा कोविड लसीच्या संदर्भात गैरसमज व अफवा पसरवून साशंकता निर्माण करण्यात आली, तेव्हा जी असामाजिक तत्वे यामागे होती, तीच असामाजिक तत्वे या सर्व रॅकेट च्या मागे असण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राने करोना काळात अतिशय हीन प्रकार अनुभवले आहेत. पोलिसांवर हल्ले, लॉकडाऊन चे नियम जाणीवपूर्वक तोडणे, करोनाबद्दल अफवा पसरवणे, तोतये डॉक्टर बनून करोना रुग्णांवर उपचार करणे, तबलीग जमात सारख्या संघटनांकडून करोनाचा प्रसार वाढणे, प्रार्थनास्थळे बंद न करणे, खाद्य पदार्थांवर थुंकी लावणे असे अनेक किळसवाणे प्रकरणं महाराष्ट्रासह देशाने पाहिले आहेत. करोना लस बनावट प्रमाणपत्र प्रकरणात मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले गेले आहेत. धुळे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. करोना बद्दल पसरवलेल्या अफवा, भीती यामुळे अनेकांनी अजूनही लस घेतली नाही, असा एक मोठा वर्ग या बनावट प्रमानपत्रांना बळी पडला आहे. या लोकांना प्रशासन व सरकारपेक्षा या अफवा पसरावणार्या मंडळींवर अधिक विश्वास असला तरी यात त्यांच्याच जीवाला धोका अधिक आहे हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.

करोना संकट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. एका व्यक्तीची चूक हजारो लोकांना महागात पडू शकते. त्यामुळे समाजात अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती व संघटना यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. दुर्दैवाने लोकप्रतिनिधीच अश्या आरोपींना पाठीशी घालताना दिसून येते. करोना संकट सर्व मानवजातीसाठी असलेले संकट आहे. त्याचा संबंध धर्म, वंश, जात, राजकारण आदी गोष्टींशी न लावता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले पाहिजे. अन्यथा उर्वरित समाजात सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर साशंकता निर्माण होऊन अराजक वातावरण होऊ शकते.

◾️खऱ्या प्रमाणपत्राची खात्री कशी करणार?

दोन्ही डोस घेतल्यानंतर आपल्याला मिळणारे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे यासाठी आपल्या प्रमाणपत्रावरील QR कोड महत्वाची भूमिका निभावतो. आपल्या मोबाईल वरून प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला खात्री करता येते. जर प्रमाणपत्र खरे असेल तर आपल्याला स्कॅनिंग नंतर आपली सर्व माहिती दिसून येते, अन्यथा चुकीची माहिती असा मॅसेज येतो. जर प्रमाणपत्र चुकीचे असेल तर लगेच प्रशासनाला याची माहिती दिली पाहिजे. आपल्या गावात, शहरात कुठे असे अनैतिक प्रकार घडत असतील तर त्याची माहिती एक जागरूक नागरिक म्हणून आपण पोलिसांना जरूर दिली पाहिजे.

  • कल्पेश जोशी, संभाजीनगर
    संपादक, विश्व संवाद केंद्र देवगिरी

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Back to top button