News

परदेशातील लाखोंची नोकरी सोडून ‘मराठी’तरुणाने आपल्या गावातच सुरु केली IT कंपनी;

सध्याच्या काळात जगण्यासाठीची स्पर्धा खूपच वाढली आहे. प्रत्येकजण या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. या शर्यतीत टिकायचं म्हणजे आपली आर्थिक बाजू मजबूत असणे महत्त्वाचे आहे.म्हणूनच प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी धडपडत आहे. आजच्या पिढीतील मुलांना पैशाच्या मागे धावणारी आणि स्वतःचा फायदा आधी बघणारी मुलं म्हटलं जात. पण ही गोष्ट खोटी ठरवत रावसाहेब घुगे प्रेरणादायी कामगिरी केली आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात प्रतिमहिना १२ लाख रूपयांची नोकरी सोडुन अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात ऐका शेतकऱ्यांच्या मुलाने स्व:त्ताचीच आयटी कंपनी स्थापन करून शेकडो शेतकय्रांच्या मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.रावसाहेब हे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत.

३१ जुलैला या आयटी कंपनीचे उदघाटन होणार आहे. रावसाहेब घुगे यांच्या या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थी, विध्यार्थीनींना शिक्षणाची, नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी रावसाहेब घुगे यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button