News

अखेर हातोडा पडलाच; शुभ मुहूर्तावर शिवप्रेमींची इच्छा सुफळ

अफजल खानाच्या कबरीजवळ कारवाई, बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात

आज ३६४ वा शिवप्रताप दिन,
 
 गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२, सकाळी स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास ( Afzal Khan Kabar ) सुरूवात करण्यात आली आहे. त्यावेळी अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम पाडताना मीडिया प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून ६ ते ७ किलोमीटर दूर हटवण्यात आले. अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते . कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. अफझल खानाची प्रतापगडावरील कबर पाडण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली होती. सध्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतापगडावरील कबरीच्या ठिकाणी केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झालेली आहे.

आजच्याच दिवशी, १० नोव्हेंबर १६५९ रोजी कोथळा बाहेर काढून क्रूरकर्मा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी गाढला. मेल्यावर वैर संपत या हिंदूंच्या सहिष्णू तत्वाप्रमाणे महाराजांनी खानाची कबर बनवण्यास परवानगी दिली. मात्र, या चांगुलपणाचा गैर फायदा घेऊन ठराविक लोकांकडून इतिहासात बदनाम असलेल्या क्रूरकर्म्या अफ़जुल्याचे उद्दात्तीकरण सुरु होते. मागच्या काही वर्षांपासून एखाद्या थोर माहात्म्याची कबर असावी, अशा थाटात काही लोक तिचे फुलं चढवत होते. अखेर राष्ट्रीय भावनेने प्रेरित सरकार सत्तेवर येताच खानाच्या कबरी भोवतीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला,तो देखील ‘शिवप्रताप दिनी’ या बद्दल सरकारचे मनःपूर्वक आभार..

अफ़जुल्याची कबर आणि वाद

१९८० ते ८५ या कालावधीत अफझलखानाच्या कबरीजवळ अतिक्रमण व्हायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. याठिकाणी उरूसही भरवण्यात येत होता. त्यानंतर या कबरीचे दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती.

अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद १९९० पासून सुरू होता. अफझलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणे केली जात होती. दर्गा बांधण्यात येत होता. तसेच, अफझलखानाचे दैवतीकरण केले होते. तसा आरोपही १९९० सालीच करण्यात आला होता. या आरोपानंतर सुरू झालेला वाद अद्याप सुरूच आहे.अफजलखानाच्या कबरीभोवती करण्यात आलेलं अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी २००६ मध्ये स्थानिक नागरिकांनी आंदोलन हे केलं होतं. तेव्हापासून हा वाद कोर्टात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टाने कबरी भोवती झालेलं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पुढे सुप्रीम कोर्टात आव्हानही देण्यात आले होते.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाने ही बांधकाम अनधिकृत ठरवत तोडण्याची सूचना दिली होती. मात्र तरीही हे अवैध बांधकाम पाडलं जात नव्हतं.आणि आता अखेर ही कारवाई करण्यात येत आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी प्रशासनाने बुधवारी रात्रीपासूनच तयारी केली आहे. कमालीची गुप्तता पाळत आज पहाटेपासून अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली आहे.

आमचा हिंदू बांधव का कमालीचा (अति) सहिष्णू आहे म्हणूनच या मुस्लिम धर्मांधांची हिम्मत बळावते. आमच्या ऐतिहासिक स्थळांभोवती , गडकिल्ले आणि मंदिरांच्या आजू-बाजूला अश्या अनेक अनधिकृत मजारी दर्गे आपल्याला दिसून येतील.गरज आहे ती फक्त डोळे उघडण्याची…

सुरुवात तर झालीच आहे “दौलताबादचे- देवगिरी” करून, बाकी महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच…

Back to top button