CultureSpecial Day

संत शिरोमणी रोहिदास महाराज

संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी समाजात भक्ती, ज्ञान व कर्मयोगाद्वारे सतधर्म जागृती केली. समाजातील भेदभाव दूर होऊन समरस समाजनिमिर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

काशी येथे हिंदू साधू संतांच्या सहवासात त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी हिंदू धर्मशास्त्र व ग्रंथांचे अध्ययन केले. वडिलोपार्जित त्यांचा चांभार व्यवसाय होता. पण ईश्वर भक्तीत त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.

उत्तर भारतात त्यावेळी मुघलांचे शासन होते. त्यामुळे संत रोहिदास यांच्यावर मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाब आणला गेला होता. त्यावेळी त्यांनी बाणेदार उत्तरं दिलं…

“वेद धर्म सबसे बडा अनुपम सच्चा ज्ञान ।
फिर मैं क्यों छोडू इसे पढलू झूठ कुरान।।”

ज्यावेळी हा दबाब प्रचंड वाढला संत रोहिदास यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला त्यावेळी ते म्हणाले,

“वेद धर्म छोडू नही कोसीस करो हजार ।
तिल – तिल काटो चाहे गोदो अंग कटार”

अश्या महान संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शत शत नमन!

Back to top button