IslamNews

तबलिगी ‘इज्तेमा’साठी तालिबानी फर्मान

हिंदू विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या निरागसतेचा फायदा घेण्याचे सुनियोजित षडयंत्र तबलिगी घेतायत आणि त्याला आमचे लोकप्रतिनिधी बळी पडतायत हे संतापजनक

तबलीगी जमातने आयोजित केलेल्या इज्तेमामध्ये मुस्लिम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी लातूरने शाळांना २ दिवस सुट्टी जाहीर

महाराष्ट्रातील लातूर जिल्हा प्रशासनाने, तबलीगी जमातने आयोजित केलेल्या ‘इज्तेमा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इस्लामिक इव्हँजेलिकल इव्हेंटच्या निमित्ताने २ दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देऊन शहरातील शाळांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्व मुस्लिम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देऊन शाळांनी दोन दिवस सुट्टी जाहीर करावी, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य असलेले विक्रम वसंतराव काळे यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या आधारे लातूर जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागातील गटशिक्षण अधिकाऱ्यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

लातूर जिल्ह्यातील औसा शहरात इज्तेमा आयोजित केला जात असून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांच्या ‘बौद्धिक आणि सामाजिक वाढीसाठी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महत्त्वाचे असल्याचे आमदार काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दुर्दैव म्हणजे सदर आमदार विधान परिषदेवर शिक्षक मतदार संघातून निवडून गेले आहेत, शिक्षकांचे विविध प्रश्न वरिष्ठ सभागृहात मांडायचे सोडून त्यांनी मात्र हा तबलिगी मार्ग निवडला.

तबलिगी ‘इज्तेमा’साठी दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करणारे अधिकारी आणि सुट्टी द्यावी असे आशयाचे पत्र देणाऱ्या आमदारांचे डोके ठिकाणावर आहे का? आणि आमदारांनी असे एखादे शिफारस पत्र दिले तरी त्याला बळी पडण्याचा नेभळटपणा सरकारी अधिकाऱ्यांनी का दाखवावा? अशी सुट्टी देणे घटनाबाह्य आहे हे ते शिक्षणाधिकारी ठणकावून सांगू शकले असते. शिक्षकांनी देखील आपल्या लोकप्रतिनिधीला हे घटनाबाह्य असल्याचे रोखठोकपणे सांगायला हवे होते. शेवटी याच शिक्षकांच्या मतांवर ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत. आपल्या मतदारांना दुखावणे त्यांना परवडणारे नाही.

फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी निरागस हिंदू मुलांना आणि त्यांच्या पालकांना परधर्मीयांच्या असल्या कट्टरतावादी धार्मिक कार्यक्रमासाठी वेठीस धरणाच्या अधिकार तुम्हाला दिला कोणी ?

उद्या लातूर शहरात असाच एखादा भगवद्गीतेवरील प्रवचनाचा धार्मिक कार्यक्रम असेल तर लातूर जिल्हा प्रशासन त्यासाठी २ दिवस शाळा बंद ठेवेल काय? परत धर्मीय विद्यार्थ्यांनी त्या प्रवचनांना उपस्थित रहावे असे निर्देश जारी करण्याची हिम्मत आहे का? नसेल तर हे परधर्मीयांचे एकतर्फी लांगुलचालन कशासाठी?

तबलिगी इज्तेमा म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहीत आहे का ?

इज्तेमा म्हणजे ‘मुस्लिमांना कट्टर मुस्लिम बनवणे’,. तबलिगी जमातचा “तबलिगी इज्तेमा” हा एक अविभाज्य भाग आहे, ही एक जागतिक इस्लामिक मिशनरी चळवळ आहे जी मुस्लिमांना प्रेषित मुहम्मद यांच्या काळात ज्या प्रकारे इस्लामचे पालन केले जात होते त्याकडे परत जाण्याचे आवाहन करते. २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली इस्लामिक धार्मिक चळवळींपैकी एक मानली जाते.

तबलीगी जमात म्हणजे काय?

तबलीगी जमात ही एक कट्टर मुस्लिम संस्था आहे. १९२६ सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास यांनी ही संस्था स्थापन केली होती. आज जवळपास १४० देशात तबलीगी जमात पसरलेली आहे.

तबलीगी जमातचा पहिला जाहीर कार्यक्रम १९४१ मध्ये झाला होता. त्यावेळी अंदाजे २५,००० जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

६ कलमी कार्यक्रम –

तबलीगीच्या धर्मप्रचाराचे ६ कार्यक्रम आहेत –

*कलमा – कलमाचं वाचन करणे.
*सलात – दिवसातून ५ वेळा नमाज पठण करणे.
*इल्म – इस्लामचं शिक्षण घेणे.
*इकराम ए मुस्लीम – मुस्लीम समुदायातील लोकांचा सन्मान करणे.
*इख्लास ए नियत – प्रामाणिक उद्देशाने काम करणे.
*दावत ओ तबलीग – इस्लामचा प्रचार करणे.

तबलीगी समाजामध्ये कट्टरता पसरवते. त्यामुळे सरकारने या विकृत संघटनेवर बंदी घालावी.

याच धर्तीवरची पुढील बातमी बघा…

‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’च्या मुंबईतील दादर, गोवंडी येथील शाखांनी १ डिसेंबर २०२२ पासून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ रविवारऐवजी दर शुक्रवारी बंद राहील, असा फतवा काढला होता. या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटना आणि जागृत नागरिकांनी विरोध केला होता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा असा प्रयत्न निषेधार्ह आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये बँक मुसलमानधार्जिणे निर्णय घेत असल्याची भावना निर्माण झाली होती. शासकीय बँकांमध्ये मुस्लिम धर्माला झुकते माप देण्याचा निर्णय घेणे, हे अन्य धर्मीयांवर अन्याय केल्यासारखे आणि आपल्या संविधानाच्या विरुद्ध आहे.

या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येईल की, आपल्या देशातील कट्टर मूलतत्ववादी मुसलमानांची सुनियोजित षड्यंत्रे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. आपल्याला सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.

धर्मो रक्षति रक्षितः।

Back to top button