Opinion

कोरेगाव भीमा…..एक भळभळती जखम:-भाग २

या दोन्ही मतप्रवाहात पुर्णतः विरोधाभास आहे, म्हणजेच खोटा इतिहास रेटून भारतात निर्माण होत असलेल्या जातीय सलोख्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्र विघातक शक्तींनी चालवले आहे , असे आढळून येते. एडवोकेट रोहन जमादार माळवदकर यांच्या या पुस्तिकेत केलेल्या आवाहनाला आजपर्यंत कोणीही पुराव्यानिशी खोडून काढलेली नाही . फक्त आपल्या भाषणांमध्ये , छोट्या मोठ्या पत्रकाद्वारे त्यांना शिव्या देण्याचे काम ही खोटारडी मंडळी करत असतात. जर खरा इतिहास समोर आला तर अनुसूचित जाती आणि तथाकथित उच्चवर्णीय यांच्यात संघर्ष पेटता ठेवणे त्यांना शक्य होणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे पुन्हा खोटे नाटे आरोप करून अनुसूचित जातीच्या तरुणांची डोकी भडकवण्याचे काम ही मंडळी करत आहेत.

शिकलेला अनुसूचित जाती चे तरुण आज सर्व समाजाबरोबर मुख्य प्रवाहात खांद्याला खांदा लावून काम करत असताना समरस झालेला आहे. जातीपातीच्या भिंती या आंतरजातीय व्यवहारातून मोडून पडत आहेत .त्यामुळे हळूहळू जातीअंताकडे समाजाचे मार्गक्रमण सुरु आहे. परंतु असे झाले तर ज्यांची रोजी रोटी यावर सुरु आहे ,त्यांच्यासाठी हे मोठे नुकसानकारक ठरणारे आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि तथाकथित उच्चवर्णीय हा संघर्ष कायम राहावा , यासाठी खोटा इतिहास सातत्याने सांगून माथी भडकवत ठेवण्याचे काम ही मंडळी करताहेत. षडयंत्रपूर्वक अनुसूचित जातीच्या चळवळीचा ताबा त्यात घुसून काही शहरी नक्षलवादी मंडळी घेत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा ची जखम भळभळती राहील, याची खबरदारी ही मंडळी घेत असतात. त्यामुळे खरा इतिहास पुढे येणार नाही याची काळजी ते घेत असतात अन्यथा रोहन माळवदकर यांच्या या पुस्तिकेतील आवाहनाला पुराव्यानिशी उत्तर देता आले असते. पण तसे करणे त्यांच्यासाठी सोयीचे नाही.

निश्चितच कोरेगाव भीमाच्या चकमकीत महार सैनिकांनीही शौर्य गाजवले आहे .परंतु इतिहासात बदल करून विद्वेष पसरण्याचे काम राष्ट्र विघातक शक्ती जातीय सलोखा बिघडण्यासाठी करताना दिसत आहेत . अनुसूचित जातीच्या तरुणांची माथी भडकवण्यासाठी ब्राह्मण द्वेषाची फोडणी दिली की पुरेसे असते. याचा पुरेपूर वापर या ठिकाणी झालेला आढळतो.

मुंबईत दरवर्षी भारतातून ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी, आपल्या या दैवतासमोर नतमस्तक होण्यासाठी , मानवंदना देण्यासाठी लाखो अनुसूचित जातीचे बांधव येत असतात .आज पर्यंत कोणतीही अनुचित घटना घडल्याच्या ऐकीवात नाही. उलट आता तर मुंबईकर सर्व अनुसूचित जातीच्या बांधवांच्या सोयीसाठी अन्नछत्र व इतर सेवा देत असतात.

जर केवळ कोरेगाव भीमाच्या २०० व्या वर्षपूर्तीनिमित्त जयस्तंभावर महार सैनिकांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी अनुसूचित जातीचे बांधव येऊन जाणार होते , तर दंगल उसळण्याचे कारणच काय?

राष्ट्रविघातक शक्तींना या देशात जातीय सलोखा निर्माण होऊ न देता,कायम जाती जातींमध्ये विस्तव धगधगत ठेवायचा आहे. त्यांच्या कटकारस्थानाशिवाय हे शक्य आहे का? राजकीय पाठबळ व आंतरराष्ट्रीय षडयंत्रांतर्गतच २०० वर्षपुर्तीचे निमित्त साधून दंगल घडवत हा जाती द्वेषाचा विस्तव धगधगत ठेवण्याचा व ही जखम भळभळत ठेवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?

एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत,बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आज सर्व समाजाला शिक्षणाची कवाडं उघडी झाली आहेत . सर्व समाज शिक्षित झालेला आहे, होतो आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग खरे काय आणि खोटे काय? हे तपासण्यासाठी आपणच केला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी,राजकारणासाठी कोणी आपला वापर तर करून घेत नाही ना? एवढे भान तर आपण राखायलाच हवे. अत्यंत चतुराईने सामान्य भाबड्या समाजाच्या मनात विष कालवून, देशाच्या कानाकोपऱ्यात आज जातींच्या पलीकडे जाऊन जो सलोखा निर्माण झाला आहे. तो डोळ्यात खुपणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींच्या इकोसिस्टीमला आपण व आपला भोळा समाज बळी पडणार नाही,याचे भान राखले पाहिजे.

जय भीम जय मीम करणारे आमच्या आया बहिणींचे राजरोसपणे तुकडे करताना आपण बघतो आहोत . लांडगे कोणत्या रुपात येऊन आपल्या कळपात( म्हणजे अनुसूचित जातीच्या चळवळीत) घुसताहेत, हे सतर्क राहून हाणून पाडले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा मार्ग अनुसरुनच न्याय मिळवला पाहिजे . अन्यथा आपणच घटनाविरोधी /संविधान विरोधी ठरु.

अनुसूचित जातींमधील ब्राह्मण द्वेषाच्या विद्रोहावर सतत फुंकर मारुन,हा विस्तव धगधगता ठेवणा-यांचे मनसुबे आता ओळखायला हवेत. बाबासाहेबांनी सर्व समाजाला सोबत घेऊन अस्पृश्यांसाठी लढा दिला. आपण कोणाच्याही हातातले बाहुले बनणार नाही, याची अनुसूचित जातीच्या बांधवांनी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच जातीय सलोखा दृष्टीक्षेपात असताना आणि सर्व समाज समरस होत असताना , राष्ट्रविघातक शक्तींच्या गोरि्रला काव्याला बळी न पडता, ही विद्वेषाची जखम भळभळती ठेवू इच्छिणा-यांच्या मनसुब्यांना उडवून लावले पाहिजे.

समाप्त

https://fb.watch/hLScT648FL/?mibextid=RUbZ1f

Back to top button