IslamNews

धर्मांध इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातील खुलेआम धर्मांतरण…

इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तान ( Islamic Republic of Pakistan) च्या सिंध प्रांतातून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हिंदू-भिल समाजातील ३० पुरुष, ३० महिला आणि २२ लहान मुलांचे खुलेआम धर्मांतरण (conversion) करण्यात येत आहे. धर्मांध इस्लामी गट इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानातील सिंध (Sindh) प्रांतामध्ये खुलेआम धर्मांतराचे काम करत आहेत.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या हिंदू (Hindu) समाजातील भिल हा आर्थिक दृष्ट्या गरीब वर्गातला आहे. मोठमोठ्या मुस्लिम जमीनदारांकडे तो अक्षरशः वेठबिगार म्हणून पिढ्यानपिढ्या राबतो आहे, अशी प्राथमिक माहिती मिळते. धर्मांतराच्या दृष्टीने तो मुस्लिम धर्मांधांचे सॉफ्ट टार्गेट आहे. तरीही बहुसंख्या भिलांनी गेली 75 वर्षे आपला धर्म टिकवून ठेवला हे कौतुकास्पदच मानावे लागेल. जेव्हा धर्मांतराच्या दबावाची परिसीमा झाली तेव्हाच त्यांनी धर्मांतर केले असावे.

जिथे नावाजलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना (Yusuf Yohana)चा टिकाव लागला नाही; तो धर्मांतर करून मोहम्मद युसुफ झाला तिथे या गरीब, लाचार, असहाय्य भिलांची कथा ती काय…

जगाला दाखवण्यासाठी सदर व्हिडिओ मधील मौलाना त्या हिंदू भिल बांधवांना, इस्लाम स्वीकारण्यासाठी तुम्हाला कोणी थमकावले नाही ना? तुमच्यावर कोणी दबाव आणला नाही ना? असे विचारून त्यांच्याकडून नकारार्थी उत्तर घेत आहे. धमकावल्याशिवाय हिंदू भिल बांधवांनी हिंदू धर्म सोडला असेल काय? या धर्मांतरामागील सत्य न समजण्या एवढे जग दुधखुळे नाही. या हिंदू भिल(Bhil) बांधवांनी स्वखुशीने इस्लाम स्वीकारला आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या “scripted” व्हिडिओ मार्फत त्या धर्मांध मौलवीने केलेला आहे. तरीही त्या हिंदू भिल बांधवांची लाचारी व्हिडिओ लपून राहत नाही.

सिंध (Sindh) प्रांत सध्या हिंदूंवरील अत्याचाराचे प्रमुख केंद्र बनले आहे, कारण जास्तीत जास्त हिंदू हे पाकमधील सिंध प्रांतात राहतात. तेथे सध्या त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. धर्मांतरण करणाऱ्या एका मियां मिठू नावाच्या मौलवीने तर बिगरमुस्लिमांना मुस्लीम करणे हेच मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे विषारी वक्तव्य केले आहे.

सिंध प्रांतात हिंदू, पंजाबमध्ये शीख सांप्रदायिक बांधव , खैबर पख्तूनख्वाहमध्ये कैलाश समुदाय आपलं जबरदस्तीने धर्मांतर होत आहे अशी तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. या सर्व अल्पसंख्यांक समुदायांच्या तक्रारीत “धर्मांध मुसलमानांनी आपल्या मुली पळवून नेणे” हे समान सूत्र आहे.

इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानमधील मानवाधिकार आयोगाने 2018 साली धार्मिक स्वातंत्र्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार दरवर्षी अल्पसंख्यांक (Minority) समुदायातील जवळपास किमान १ हजार मुलींना पालकांच्या डोळ्यादेखत घरातून अपहरण करून, त्यांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करून, एखाद्या मुसलमानासोबत निकाहच्या घटना घडत असल्याचं दिसून आलं. तसंच त्यातील बहुतांश हिंदू मुली अल्पवयीन अर्थात 18 पेक्षा कमी वयाच्या असतात. 2 टक्क्यांपेक्षा कमी उरलेल्या हिंदू समाजातील 1 हजार मुली दरवर्षी पळवणे ही संख्या खूप मोठी आणि अत्यंत भयावह आहे.

1947 च्या फाळणीच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची हिंदू जनसंख्या 20 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त होती. अनेक हिंदू सिंधी बांधव आपली जमीन जुमला, घर बंगला, संपत्ती याच्या मोहापायी म्हणा किंवा कायदे आजम मोहम्मद अली जिना यांच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीवेळी केलेल्या सेक्युलर भाषणामुळे, आज ना उद्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात शांतता नांदेल या वेड्या आशेपायी म्हणा; पिढ्यान पिढ्या जिथे होते तिथेच राहिले. मात्र 15 ऑगस्ट 1947 नंतर देखील लक्षावधी मुहाजिर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची व हैद्राबाद शहरात आसपासच्या ग्रामीण क्षेत्रात पोहोचले. सिंध प्रांतातील हिंदू मुसलमान दंगली खऱ्या अर्थाने त्यानंतर सुरू झाल्या. फाळणी नंतर भारतातून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये मोठ्या संख्येने पोहोचलेल्या मुसलमानांनी अर्थात मोहाजीरांनी मागे राहिलेल्या हिंदूंना हुसकावून लावून त्यांच्या संपत्ती बळकवायला सुरुवात केली.

सिंध प्रांताच्या तात्कालीन मुख्यमंत्री मोहम्मद अयुब खुहरो यांच्या राज्य सरकारने या दंगली थांबवण्याचे कोणतेही कष्ट घेतले नाहीत. त्यांच्या दृष्टीने पाहुण्याच्या हातून साप परस्पर मारला जात होता. त्यांना आमच्या सिंधी हिंदू बांधवांचे पलायन तर हवे होते मात्र त्यांची संपत्ती मोहाजीरांना द्यायची तयारी नव्हती. स्थानिक मुसलमान सिंधी समाजाचा या संपत्तीवर डोळा होता. भ्रमनिरास झालेल्या सिंध प्रांतातल्या हिंदू बांधवांना रावीपार भारताकडे प्रयाण करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यातूनही हिमतीने जे हिंदू बांधव मागे राहिले त्यांच्या नशिबी इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आपल्या आयुष्याचे धिंडवडे निघणे इस्लामी संस्कृतीला धरूनच आहे. त्याचा पुरावाच या व्हिडिओ मधून आपल्याला मिळतो.

त्यामुळे 1951 च्या जनगणनेनुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात १२.९ टक्के हिंदू धर्मीय वास्तव्यास होते. पण आता या देशात फक्त १.६ टक्के हिंदू उरले आहेत. अल्पसंख्याकांची सतत घटणारी लोकसंख्या इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानातील त्यांच्या परिस्थितीचे भयावह चित्रच मांडते. कट्टरतावादी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान एकीकडे धार्मिक उन्मादापोटी हिंदूंची स्थळे उद्ध्वस्त करत आहे आणि प्राचीन ऐतिहासिक वारसा नष्ट करत आहे. हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने केलेले धर्मांतर म्हणजे हिंदूंचा वंश वाढू न देण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या धार्मिक छळाला कंटाळून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील अनेक हिंदूंनी भारतात स्थलांतर केले आहे.

गेल्या ७५ वर्षांमध्ये इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तान मधील हिंदू रसातळालाच चालला आहे. एवढाच प्रश्न पडतो की, एरवी भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होण्याचा मोठा कांगावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आता कुठे आहेत ? की अल्पसंख्यांक म्हणजे फक्त मुसलमान या त्यांच्या लाडक्या समीकरणानुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील 98 टक्के मुसलमान समाजाला देखील ते अल्पसंख्यांकच समजतात का??

Back to top button