NewsScience and Technology

शास्त्रज्ञ ६
विषमुक्त पर्यावरणाचा ध्यास सी आर कृष्ण मूर्ती

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

आईच्या दुधात सापडणारे कीटकनाशकाचे अंश असोत की कॉलरावरील उपचार असोत प्रदूषकांमधल्या जड धातूंची समस्या असो की, भोपाळ वायू दुर्घटनेसारख्या भीषण औद्योगिक अपघातांच्या घटना असोत, डॉ. कोइम्बतूर रामदुराई कृष्ण मूर्ती ( c r krishna murti )लोकांच्या भल्यासाठी तळमळीने त्या विषयावर उपाय शोधत. अशाच तळमळीतून त्यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेचा आराखडाही बनवला जो आजही सर्वांना मार्गदर्शक ठरतोय.

गंगा नदी (ganga river) स्वच्छ करण्यासाठीचा गंगा अक्शन प्लान हे एक मोठंच अवघड कार्य आहे. आज अनेक संसाधने सोबत असतानाही ते कितीतरी अवघड आहे. पण, मी आजच्या काळाचं सांगत नाहिते. तर, ज्यांनी या महा जीवनदायिनी नदीच्या शास्त्रीय अभ्यासाचं नेतृत्त्व केलं त्या महान शास्त्रज्ञाचं २०२३ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. डॉ. कोइम्बतूर रामदुराई कृष्ण मूर्ती हे त्यांचं नाव. त्यांनी लिहिलेला ग्रंथ ‘द गंगा अ सायंटिफिक स्टडी’ हा आजही ज्यांना ज्यांना गंगा स्वच्छतेची आस लागलेली आहे अशा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.

डॉ. मूर्तीचा जन्म ३ मार्च १९२३ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९४८ साली जैवरसायनशास्त्रात पीएचडी पदवी मिळवली आणि १९५० मध्ये ते लखनौ येथे नव्याने स्थापन झालेल्या सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रुजू झाले. तिथे त्यांनी त्यावेळी भारताला भेडसावणाऱ्या कॉलरावरील उपचारात प्रति- जैविकांचा वापर करावा की नाही, यासारख्या काही तातडीच्या प्रश्नांवर काम केले. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी ज्या समस्यांवर काम केलं त्यात दुधाचं दही करणं, हा विषयही होता. पारंपरिक पद्धतीने पनीर बनवण्यासाठी अंजिराचं दूध उपयुक्त ठरतं, असंही त्यांनी दाखवून दिलं. त्यासाठी त्यावेळी त्यांनी वेगळी केलेली वितंचके (एन्झाइम्स) अजूनही वापरात आहेत.

तेथून पुढे मूर्ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजीकल रिसर्चमध्ये (indian institute of toxicology research) दाखल झाले आणि १९८३ मध्ये सेवानिवृत्त होताना ते त्या संस्थेचे संचालक बनलेले होते.

मूर्ती यांना पर्यावरणीय परिणामांबद्दल खूप आस्था होती आणि ती पिकांवर शिल्लक राहणाच्या किटकनाशकांच्या अंशावर त्यांनी केलेल्या कामात प्रतिबिंबित झालेली दिसते. डीडीटीच्या अतिवापरामुळे घातक रसायनं जमिनीत पाण्यात, माशांमध्ये आणि मानवी शरीरातही कशी जाऊन बसली आहेत, हे त्यांच्या चमूने दाखवून दिलं. त्यांनी पक्षी, मासे, गुरं, आणि मानवी शरीरात ही रसायनं कुठे कुठे साचून गेलं.. राहतात, हे शोधून काढलं. ही विषारी रसायनं आधी गर्भावस्थेत आणि नंतर मातेच्या दुधातून पुढच्या पिढीकडे जन्मतःच कशी नेली जातात, हे ही त्यांनी दाखवून दिलं. या संशोधनाचा परिणाम म्हणून आजच्या काळात आखली गेलेली कीटकनाशकांच्या वापराबाबतची कठोर धोरणं.

मूर्ती यांचं सारं संशोधन आपल्या जीवनाशी जवळून संबंधित असलेल्या आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांशी संबंधित होतं. नवजात अर्भकांना होणारी कावीळ आणि विषबाधा किंवा दाह झाल्यावर त्या घटनांमध्ये असलेली लिपिड पेरॉक्सिडेशनची भूमिका या दोन विषयांवरील त्यांचं योगदान फार मोलाचं आहे.

पर्यावरणीय घटकांचा विषारीपणा आणि त्यातून होणारी विषबाधा हे ही त्यांच्या निधन झाले. संशोधनाचे एक महत्त्वाचे सूत्र राहिले आहे. आयआयटीआरचे संचालक म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पाचं फलित म्हणजे त्यांचा ‘द गंगा – अ सायंटिफिक स्टडी’ हा ग्रंथ. त्यानी केलेला हा प्रचंड अभ्यास आजही नदी पुनरुज्जीवनाच्या किंवा जैवविविधता संवर्धनाच्या सर्व प्रयोगांचा आधार आहे.

कीटकनाशकं असोत की कॉलराची विषं अथवा उद्योगांमधील जड धातूंचं प्रदूषण की भोपाळ वायू दुर्घटनेसारख्या औद्योगिक अपघातांच्या घटना असोत, मूर्तीचा संबंध सर्वत्र येई. भोपाळ दुर्घटनेनंतर अशा घटना कशा टाळाव्यात याबद्दल विचार विनिमय सुरू झाला तेव्हा सल्लागार म्हणून मुर्तीींनाच पाचारण केलं गेलं.

आपले पर्यावरण विषमुक्त रहावे यासाठी मुर्तीींनी केलेल्या प्रयत्नांना आयसी- एमआरचा बसंती देवी अमीरचंद पुरस्कार (१९७३), इन्साचं सुंदरलाल होरा पदक (१९८१) आणि पितांबर पंत राष्ट्रीय पर्यावरण फेलोशिप (१९८३) यांसारख्या अनेक व्यासपीठांवर नावाजलं गेलं. ते बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे फेलो होते, तसेच सोसायटी ऑफ बायोलॉजी केमिस्टस् या संस्थेचे सदस्य होते. विज्ञान लोकप्रियीकरणातही त्यांना मोठा रस होता. त्यातूनच त्यांनी मद्रास सायन्स फोरमची स्थापना केली ज्याचे कार्य अजूनही सुरू आहे. मूर्ती यांचे ३० जून १९९० ला निधन झाले.

लेखक :- कोल्लगल शर्मा

(कोल्लगल शर्मा हे सीएसआयआरचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक आणि प्रख्यात विज्ञान लेखक आहेत.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button