News

सकल हिंदू समाज श्रीमलंग जागरण धर्मसभा

तिथी :- मिती फाल्गुन शुध्द त्रयोदशी शके १९४४ रविवार दि. ०५ मार्च २०२३ रोजी सायं. ०४ वा.

धर्म सभेपुढील ठराव

१. सकल हिंदू समाजाच्या(sakal hindu samaj ) स्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा याद्वारे ठराव पारित करते की श्री मलंगगड (malanggad) हे पवित्र स्थान महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे व त्यास योग्य विकास नियोजन करून विकासाठी निधी तरतूद करण्यात यावी.

२. सकल हिंदू समाजाच्या स्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा याद्वारे ठराव पारित करते की मलंग गडावरील वरील पवित्र समाधी स्थाने यावरतेथील पारंपारिक हिंदू पूजा पद्धती व हिंदू उपचार अखंडित ठेवून त्या स्थानाबाबत असलेले खटले तसेच धर्मादाय आयुक्त यांचे कडील चौकशी यांची लवकरात लवकर गुणवत्तेवर चौकशी होऊन न्याय मिळावा.

३. सकल हिंदू समाजाच्यास्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा( shree malang jagran dharmsabha) याद्वारे ठराव पारित करते की श्री मलंगगड परिसर तसेच आसपासचे तालुके आंदोलनाबाबत जनगागृती विविध आयामातून साधण्यात यावी.

https://www.facebook.com/VSKKokan/photos/a.325860417573746/2381529412006826/?type=3

४. सकल हिंदू समाजाच्या स्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा याद्वारे ठरावपारित करते की श्री मलंगगडावरी न्यास ई ६० यामध्ये वक्फ बोर्डाने हस्तक्षेप करु नये या उच्च न्यायालायाचे निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच न्यसाचे विश्वस्तलवकरात लवकर नेमण्यात यावे व त्यासाठी स्थानिक भाविकातून विश्वस्त नेमण्यास प्राधान्य देण्यात यावे त्याचप्रमाणे न्यासाचे आतापर्यंतचे मिळकतीचे व व्यवहाराचे संपूर्ण तपासणीचे आदेश शासनाने द्यावेत व विश्वस्तांची नेमणूक कायदेशीरपणे होईपर्यंत सदर न्यासाचा कारभार पाहण्यासाठी शासनातर्फे प्रशासक नेमण्यात यावा.

५. सकल हिंदू समाजाच्या स्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा याद्वारे ठरावपारित करते की श्री पीर हाजी मलंग बाबा दर्गा न्यासाचे उत्पन्नातील योग्य उत्पन्न न्यासाचे अंतर्गत असणाऱ्या देवस्थानांवर देखील खर्च करण्यात यावे.

६. सकल हिंदू समाजाच्या स्वयं स्फूर्तीने संपन्न झालेली ही विराट श्री मलंग जागरण धर्मसभा याद्वारे ठराव पारित करते की हिंदू समाजातील महिला मुली यांचे परधर्मीयांकडून होणारे फसवणुकीचे प्रकार त्याचप्रमाणे हिंदूंचे धर्मांतरण करण्याचे प्रकार यास आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावे तसेच कुठल्याही हिंदू व्यक्तीस धर्म बदलण्यापूर्वी न्यायालया कडून परवानगी घेणे अनिवार्य करण्यात यावे.

Back to top button