Health and WellnessHinduismNewsRSS

“फाळणीच्या वेळी जे घडले ते विसरता कामा नये”:- माननीय सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसाबळे

कर्णावती (karnavati) येथे स्थलांतरित पाक हिंदू डॉक्टर्स फोरम (Migrant Pak Hindu Doctors Forum), या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून भारतात आलेल्या डॉक्टरांच्या संघटनेने 03 जुलै 2023 रोजी कर्णावती येथे कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी आजचा कार्यक्रम विशेष व अविस्मरणीय असल्याचे सांगितले. आज गुरुपौर्णिमा असून तिचे विशेष महत्त्व आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंना नतमस्तक करण्याचा हा दिवस आहे. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा भारत हा एक विश्वगुरू आहे, अशा विश्वगुरूंच्या छत्रछायेत पुन्हा भारताचे नागरिक बनलेल्या लोकांमध्ये उपस्थित राहून मला आनंद होत आहे.

1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि जे तिथे राहिले आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, ज्यांचे घर भारत आहे. ते लोक इथे येऊ शकतात. तुम्ही भारतमातेचे पुत्र आहात, आता तुम्ही कायदेशीररित्या भारताचे नागरिक आहात. भारत माता ही जगाची जननी आहे,हिंदू असल्यामुळे गांजलेल्यांचे आश्रयस्थान आहे. पारशी, ज्यू इत्यादी इथे आले आणि हिंदू समाजाने त्यांचा सहर्ष स्वीकार केला. काही काळापूर्वी इस्रायलने वेगवेगळ्या देशांतून इस्रायलमध्ये परतलेल्या नागरिकांचे अनुभव प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जगभरातील देशांतून परतलेल्या ज्यूंनी सांगितले की, आम्ही जिथे होतो तिथे आमच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. मात्र भारतातून परत आलेल्या ज्यूंनीच सांगितले – “आम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास दिला गेला नाही”. हे एकूण वर्णन भारतीय ज्यू या पुस्तकात आहे. आपल्या येथे याला वसुधैव कुटुंबकम म्हणतात,हे केवळ बोलण्याचा विषय नसून आमच्या जीवनाचा एक भाग आहे.

ते पुढे असे म्हणाले की, येथे आलेल्या आणि भारतीय नागरिकत्व मिळालेल्या सर्वांचे त्यांच्या घरी सहर्ष स्वागत आहे. देशाची फाळणी ही घोडचूक होती. भारताच्या इतिहासातील ते एक काळे पान आहे.

सरकार्यवाह जी म्हणाले की,सीएए (CAA) विरोधात मोहीम सुरु होती, परंतु आम्हाला अडथळे दूर करण्यासाठी वातावरण तयार करावे लागेल. देशाच्या फाळणीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या विषयाशी जवळचा संबंध आहे. फाळणीच्या वेळी भारतात आलेल्यांचे अनुभव चार खंडांत प्रसिद्ध झाले आहेत. फाळणीच्या वेळी जे घडले ते विसरता कामा नये आणि भावी पिढ्यांनीही याचे यथोचित भान ठेवायला हवे. फाळणीच्या वेळी संघाच्या स्वयंसेवकांसाठी श्रीगुरुजींचा आदेश होता की, जोपर्यंत तेथे एकही हिंदू आहे, तोपर्यंत तुम्ही तिथेच रहावे. हिंदूंच्या मदतीसाठी शेकडो स्वयंसेवक तिथेच थांबले होते.

दरवर्षी 14 ऑगस्टला संघाचे कार्यकर्ते अखंड भारताची शपथ घेतात. तुम्ही भारताचे नागरिक झालात, ही आनंदाची बाब आहे. आता तुम्हाला त्रास,वेदना सहन करणाऱ्या जनतेची सेवा करायची आहे. सेवा हाच आमचा धर्म,गरजू लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यासोबतच तुम्हाला पुन्हा अखंड भारत बनवायचा असेल तर तुम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात राहणाऱ्या गावाची आठवण सदैव ठेवावी.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल म्हणाले की, विस्थापित डॉक्टरांनी अंधारातून प्रकाशाकडे यशस्वी प्रवास केला आहे आणि आता ते भारताचे नागरिक म्हणून कायमस्वरूपी भारतात सेवा देणार आहेत आणि आता तुम्ही सर्व नोंदणीकृत डॉक्टर आहात. आरोग्य सेवांमध्ये आपले योगदान देणे ही अभिमानाची बाब आहे.

साभार :- विश्व संवाद केंद्र (भारत)

https://vskbharat.com/what-happened-at-the-time-of-partition-should-not-be-forgotten-dattatreya-hosabale/

Back to top button