InternationalNewsScience and TechnologyWorld

आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे.. चंद्रयान मोहीम – ३

वमिमा ओषधीः सोम विश्वास्त्वमपो अजनयस्त्वं गाः |
त्वमा ततन्थोर्वन्तरिक्षं त्वं ज्योतिषा वि तमो ववर्थ || (ऋग्वेद१-११-२२)

(हे चंद्रा, तुझ्यामुळे पृथ्वीवर सर्व वनस्पती उत्पन्न झाल्या, तू पाणी उत्पन्न केलेस व तुझ्यामुळे गाई इत्यादी प्राणी उत्पन्न झाले. रात्रीच्या विशाल आकाशात तू प्रकाशाने अंधाराचा नाश केलास.)

ऋग्वेदातल्या या सोमसूक्तात पृथ्वीवरची सजीव सृष्टी ही जणू चंद्राचीच देणगी आहे, अशी चंद्राची स्तुती केली आहे. चंद्र हा आपल्या भारतीयांच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक. चंद्राला भारतीय संस्कृतीत देवता मानून पूजन केले जाते. महिला त्याला भाऊ म्हणून ओवाळतात, तर लहान मुले त्याला ‘चांदोमामा’ म्हणतात. प्रेमीयुगल ‘फलकसे चांद’ आणण्याची स्वप्ने बघतात, तर भारताचे शास्त्रज्ञ मात्र थेट चंद्रावर उतरण्याचे स्वप्न खरे करून दाखवतात. भारताची ‘चांद्रयान’ मोहीम याचे चिरंतन उदाहरण आहे.

भारतीय महत्वाकांक्षेचा दृढसंकल्प असलेली तिसरी चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान-३ (Chandrayaan ३) ही १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता श्रीहरिकोटा (sriharikota) येथून प्रक्षेपित होणार आहे.ही मोहीम म्हणजे २०१९ चांद्रयान-२ मोहिमेचा एक भाग आहे. २०१९ मध्ये, लँडर (lander) आणि रोव्हर(rover) चंद्रावर सॉफ्ट-लँड (moon soft landing) करू शकले नव्हते, ज्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.

तीन वर्षाच्या अविश्रांत मेहनतीच्या जोरावर भारताचं यान अपयशाची मरगळ झटकून पुन्हा अंतराळात झेप घेणार आहे. इसरो (Indian Space Research Organisation (ISRO)या प्रवासात कमीत कमी इंधन वापरून सर्वोत्तम कार्यक्षमता संबंध जगाला दाखवून देणार आहे.

सतीश धवन स्पेस सेंटरमधून(satish dhawan space centre) होणार प्रक्षेपण:-

चांद्रयान-३ लाँच व्हेईकल मार्क-३ (Launch Vehicle Mark-III) द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती १०० किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान ३ अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

पहिल्यांदाच चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार:-

चांद्रयान ही भारताची महत्वाकांक्षी चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान ३ इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान १ आणि चांद्रयान २ प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान ३ चंद्रावरून उतरून तेथील वातावरण (environment) आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.

चांद्रयान-३ चा मुख्य उद्देश लँडरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवणं हा आहे. त्यानंतर ते रोव्हर प्रयोग करण्यासाठी बाहेर पडेल. लँडरच्या इजेक्शननंतर(injection) प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे (propulsion module) वाहून नेलेल्या पेलोडचे( payload system) आयुष्य तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान असते.

सुमारे ३.८४ लाख किमी प्रवास केल्यानंतर, चांद्रयान-३ अंतराळयान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.

चांद्रयान ३ मोहिमेत फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल (propulsion module):-

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-३ हा चांद्रयान १( chandrayaan 1) आणि चांद्रयान २( chandrayaan 2) चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-३ (chandrayaan 3) अगदी चांद्रयान-२ सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. चांद्रयान-२ च्या “विक्रम”( vikram orbiter) ऑर्बिटरकडून चांद्रयान ३ साठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान ३ यूएन राव उपग्रह केंद्रातून(u n rao satellite centre) प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे.

चांद्रयान ३ चे मुख्य मॉड्यूल्स कोणते आहेत?

लँडर(lander):-

लँडर हे चांद्रयान ३ मोहिमेचे हृदय असणार आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यानाच्या सॉफ्ट-लँडिंगसाठी खूप महत्त्वाचा रोल असणार आहे. लँडर कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर आणि मॅग्नेटोमीटरसह अनेक वैज्ञानिक उपकरणांनी हे लँडर सुसज्ज आहे. लँडरचे वजन सुमारे १,७२३.८९ किलो इतके आहे.

रोव्हर(rover) :-

रोव्हर हा एक मोबाइल प्लॅटफॉर्म आहे जो लँडरमधून तैनात केला जाईल हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर ५०० मीटरपर्यंत प्रवास करू शकेल इतकी क्षमता या २६ किलो वजनी रोव्हर मध्ये असणार आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल (propulsion module):-

लँडर आणि रोव्हर चंद्रावर नेण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूल अतिशय महत्वाचे असणार आहे प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर चंद्राभोवतीच्या कक्षेत अंतराळ यानाची देखरेख करण्यासाठी करण्यात येणार आहे.प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन २१४८ किलो इतके आहे.

अवकाशात गेल्यावर Chandrayaan-३ हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-३ हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लँडरमधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर संचार करणार आहे.

चंद्रयान ३ मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे यासाठी ISRO मधील वैज्ञानिक सक्षम (indian scientists)आहेत परंतु वैज्ञानिकांसाठी हा एक आव्हानात्मक मिशन( challenging mission) असणार आहे व हे मिशन भारतासाठी ऐतिहासिक घटना असणार आहे हे निश्चित.

चांद्रयान-३ चं बजेट (budget) किती?

चांद्रयान-३ या मोहिमेसाठीचं अंदाजित बजेट हे ६०० कोटी रुपये होतं. मात्र, यामध्ये थोडी वाढ होऊन, अंतिम बजेट ६१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

हॉलिवूडपटांपेक्षा (hollywood) कमी बजेट:-

स्पेसमधील प्रवास आणि दुसरे ग्रह दाखवणाऱ्या अव्हेंजर्स एंडगेम (avengers endgame) या हॉलिवूडपटाचं बजेट हे २,४४३ कोटी रुपये होतं. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अवतार:द वे ऑफ वॉटर (avatar:- the way of water) या चित्रपटाचं बजेट ३,२८२ कोटी रुपये होतं. या तुलनेत भारताच्या अवकाश मोहिमांचं बजेट अगदीच परवडणारं आहे.

रंगीत तालीम (rehearsal) यशस्वी:-

मंगळवारी इस्रोने चांद्रयान-३ मोहीमेच्या तयारीची रंगीत तालीम पार पाडली. यामध्ये सर्व उपकरणे आणि केंद्रांची तयारी तपासण्यात आली. २४ तास चाललेली ही चाचणी यशस्वीपणे पार पडल्याची माहिती इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली होती.

चांद्रयान ३ चे नेतृत्व करणाऱ्या रॉकेट वुमन( rocket woman) कोण ?

चंद्रावर चांद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू कारिधाल (Ritu Karidhal) सांभाळत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील रितू कारिधाल, ज्यांना भारताची रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते, अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इस्रोने रितू यांना चांद्रयान-३ चे मिशन डायरेक्टर( mission director) बनवले आहे. याआधी त्या चांद्रयान-२ सह अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांचा भाग राहिल्या आहेत, विशेष म्हणजे रितू कारिधाल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहे ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार(young scientist award) मिळाला आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे लाँचिंग आता अवघ्या काही तासांवर आहे.तत्पूर्वी आज इस्रोच्या वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या यशासाठी तिरुपती वेंकटेश्वर मंदिरात (tirupati venkateswara temple) पूजा-अर्चना केली आहे.यावेळी त्यांनी आपल्यासोबत चांद्रयान-३ चे लहान मॉडेलही नेले होते. त्यांनी या मोहिमेच्या यशासाठी यावेळी पूजा केली.

चांद्रयान-३ सफल झाल्यावर चंद्रावर सुरक्षित लँडिंग करू शकणाऱ्या ४ देशांत भारताचा समावेश होईल. सोमसूक्ते रचणाऱ्या वैदिक ऋषींपासून ते चंद्रावर उतरण्याचे स्वप्न सत्यात आणणाऱ्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांपर्यंत भारतीयांचे मनोविश्व व्यापणारा चंद्र त्याच्याकडे झेपावणाऱ्या ‘चांद्रयाना’चे स्वागत करायला उत्सुक आहे.

‘चांद्रयान-३’च्या सफल उड्डाणासाठी ‘इस्रो’ला मनःपूर्वक शुभेच्छा..

शुभास्ते पंथानः सन्तु ।

Bon voyage

Back to top button