InternationalNewsScience and TechnologyWorld

Grand cross of the legion of honour.. सन्मान भारताचा

ज्या फ्रेंचानी एकेकाळी पॉण्डेचेरी सारख्या हिंदुस्तानच्या छोट्याश्या भूभागावर राज्य गाजवले त्याच संपूर्ण फ्रांसच्या जनतेच्या मनावर भारत आज अधिराज्य गाजवत आहे. आणि ही सर्वसमावेशक चिरंतन हिंदू संस्कृतीची खरी ओळख आहे...

भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

फ्रान्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi ) आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन(emmanuel macron) यांच्या दरम्यान विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार असून त्यानंतर ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन (Bastille Day) सोहळय़ामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळय़ामध्ये भारताचे सैन्य दल देखील सहभागी होणार आहे.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. विमानतळावर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी मोदींचं स्वागत केलं.या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर द्विपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली आहे. मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही केलं. याच दौऱ्यामध्ये फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना,“Grand cross of the legion of honour” पुरस्काराने सन्मानित केलं असून हा पुरस्कार फ्रान्समधील “सर्वोच्च नागरी सन्मान” आहे,समस्त भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण आहे.

अभिमानाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी हे ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहे.फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा सन्मान काही निवडक नेत्यांना मिळाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीच्या माजी चान्सलर एंजेला मार्केल यांचा समावेश आहे.

भारत-फ्रान्स strategic partnership ला २५ वर्षे पूर्ण:-

१९९८ मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली तेव्हा अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले होते. तेव्हा भारताला पाठिंबा देणारा फ्रान्स हा पश्चिमेतील एकमेव देश होता. हा तो काळ होता जेव्हा दोन्ही देशांमधील मैत्रीला सुरुवात झाली होती. १९९८ मध्ये भारत आणि फ्रान्स एकमेकांचे सामरिक भागीदार बनले. दोन्ही देशांनी सामरिक भागीदार होण्यासाठी करार केला होता. त्याला २०२३ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत, सामरिक भागीदार होण्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त फ्रान्सने भारताच्या पंतप्रधानांना बॅस्टिल दिवसाच्या परेडसाठी आमंत्रित केले आहे.

बॅस्टिल दिवसाचा इतिहास..

बॅस्टिल दिवस (Bastille Day) एक प्रकारे फ्रांन्सच्या क्रांतीच्या रुपात समजला जातो. बॅस्टिल वास्तवात एक किल्ला किंवा जेल होते. येथे राजाच्या आदेशावर कैद्यांना शिक्षा दिली जायची. त्यामध्ये काही राजकीय कैदी सुद्धा होते. सतराव्या शतकात बॅस्टिल ची एक भीती,दहशत होती. मात्र १४ जुलै १७८९ रोजी राजेशाही विरोध क्रांतिकाऱ्यांनी त्यावर हल्ला केला. क्रांतिकाऱ्यांनी या दरम्यान सात कैद्यांचा जीव वाचवला होता. अशा प्रकारे बॅस्टिलचा किल्ला ध्वस्त झाला. तेव्हापासून फ्रांन्समधील सर्वसामान्य जनता या दिवसाला विजय दिवसाच्या रूपात साजरा करते.

बॅस्टिलवर ताबा मिळवणे हा फ्रान्सच्या राज्यक्रांतीची सुरुवात होती असा संकेत आहे. बॅस्टिलचा किल्ला अनिर्बंध राजेशाहीच्या शासनाच्या प्रतीक बनले होते. हेच कारण आहे की, बॅस्टिल दिवसानिमित्त फ्रांन्समध्ये लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून बॅस्टिल दिवस साजरा केला जातो.

या दिवसाला राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची सुरुवात १८८० मध्ये झाली होती. सुरुवातीपासूनत या दिवशी आतिशबाजी आणि सैन्य परेड व्हायची. सार्वजनिक उत्सवाव्यतिरिर्त देशाच्या नावाने संबोधन ही केले जाते. आधी तर १४ तारखेला विशेष आयोजनाव्यतिरिक्त जुलैच्या संपूर्ण महिन्यात नृत्य, गायन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. मात्र कालांतराने हे आयोजन एका मर्यादेपर्यंतच टिकून राहिले.

पॅरिसमधील पॅलेसमधील मॉन्स्टेक्स एव्हन्यू, फ्रान्सचे गणराज्य, फ्रान्सेली अधिकारी आणि परदेशी पाहुण्यांच्या समोर, १४ जुलैच्या सकाळी, युरोपमधील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लष्करी परेड आयोजित केली जाते.कोरोनाच्या परिस्थितीनंतर आता पुन्हा एकदा बॅस्टिल दिवसाची धुम फ्रान्समध्ये येत्या १४ जुलैला आपल्याला पहायला मिळणार आहे.

Bastille day parade :- भारतीय सेना होणार सहभागी

या वर्षी बॅस्टिल डे परेड पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक असणार आहे. १०७ वर्षांनंतर प्रथमच, भारतीय लष्कराची पंजाब रेजिमेंट पॅरिसमध्ये बॅस्टिल डे परेड दरम्यान फ्रेंच सैनिकांसोबत संचलन करणार आहे. भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याला आणि शौर्याचा गौरव करण्याचा हा ऐतिहासिक एक क्षण असेल.

सैन्य दलाचे प्रतिनिधित्व पंजाब रेजिमेंट करत आहे जी भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. या रेजिमेंटच्या सैनिकांनी दोन्ही महायुद्धांमध्ये तसेच स्वातंत्र्यानंतर केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. या तुकडीत राजपुताना रायफल्स रेजिमेंटल बँडचाही समावेश आहे. ही रेजिमेंट भारतीय लष्करातील सर्वात प्रतिष्ठित रायफल रेजिमेंट आहे.

भारतीय लष्कराच्या तुकडीमध्ये ७७ मार्चिंग सैनिक आणि ३८ बँड सदस्यांचा समावेश आहे. त्याचे नेतृत्व कॅप्टन अमन जगताप करत आहेत. भारतीय नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व कमांडर व्रत बघेल करत आहेत तर भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी करत आहेत. परेडदरम्यान भारतीय हवाई दलाचे ३ राफेल लढाऊ विमानही फ्लाय पास्टमध्ये सहभागी होणार आहे.

फ्रांस मध्ये देखील UPI चा डंका ..

सिंगापूरनंतर आता फ्रान्सनेही भारताची युनिफाइड पेमेंट सिस्टम (unified payment interface-UPI) स्विकारली आहे. “UPI च्या वापरावर भारत आणि फ्रान्सचे एकमत झाले आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत प्रसिद्ध आयफेल टॉवरपासून UPI सुरू होईल.” यामुळे आता भारतातून फ्रान्सला जाणारे पर्यटक भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याशिवाय फ्रान्सनेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसाची मुदत ५ वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणाही केली आहे.

भारत आणि फ्रान्स (france-india)दृढ मैत्रीचे प्रतीक :-

भारत आणि फ्रान्सचे संबंध फार जुने आहेत. या दोन्ही देशांमधील समानता पाहिली तर दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांना प्राधान्य दिले जाते. ज्या प्रमाणे भारत आज स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे, त्याचप्रमाणे इंडो-फ्रेंच मैत्रीपूर्ण संबंधालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर भारत-युरोप यांच्यातील मैत्रीला देखील ६० वर्षे पूर्ण झाली असून भारत आणि फ्रान्स यांच्यातील Strategic partnership ला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध काळानुसार घट्ट होत असून त्यांच्यातील विश्र्वास दृढ होत आहे.

दोन्ही देश geopolitical , अणु, अवकाश आणि संरक्षण यांसह अनेक धोरणात्मक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करत आहेत. दहशतवाद, धोरणात्मक अर्थव्यवस्था यावर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांचे समान दृष्टीकोनापासून ते विविध क्षेत्रात मजबूत द्वीपक्षीय संबंध स्थापित करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. या भागीदारीमुळे हे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत.

डिजिटायझेशन, सायबर, green energy, blue economy, ocean science आणि स्पेस यासारख्या मुद्द्यांमध्ये आत्मनिर्भर भारत( aatmnirbhar bharat) आणि फ्रांस परस्पर सहकार्याने मार्गक्रमण करीत आहेत.

आत्मनिर्भर भारतासाठी फ्रांस चे सहकार्य :-

राफेल(rafale) :-

भारताने फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच बनावटीच्या ३ स्कॉर्पियन पाणबुडय़ा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण खरेदी समितीने (डीएसी) या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. यामध्ये संबंधित पूरक उपकरणे, शस्त्रे, सुटे भाग, कर्मचारी प्रशिक्षण इत्याही बाबींचाही समावेश असेल.

Military exercise;-

दरवर्षी भारत आणि फ्रान्स यामध्ये संयुक्‍त लष्करी कवायती होत असतात.यामुळे दान्ही देशांमध्ये लष्करी तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होते. समुद्री गस्त (Maritime Security Co-operation ) हा लष्करी सहकार्यातील महत्वाचा विषय आहे.

फ्रान्स आपल्याला पाणबुडीचे तंत्रज्ञान देत आहे तसेच अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि अणुउर्जेचा उपयोग याबद्दल सहकार्य करीत आहे. २०१४ साली भारत आणि फ्रान्स यांच्यात अंतरिक्ष सहकार्याला ५० वर्षे पूर्ण झाली. भारत आणि फ्रान्स यांच्यात घनिष्ठ आर्थिक सहकार्य आहे. भारताच्या सुमारे १५० कंपन्या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत व त्यामुळे साधारण २०००० व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. भारतामध्ये फ्रान्सच्या सुमारे ७०० कंपन्या आणि उपकंपन्याआहेत.

तात्पर्य इतकेच आत्मनिर्भर भारतासाठी फ्रान्सचे सहकार्य आवश्यक आहे.

म्हणतात ना :-

वनानी दहतो वन्हे: सखा भवति मारुतः!

स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सोहृदम ॥

जंगलात आग लागली की, वारा त्याचा मित्र बनतो आणि आग पसरवायला मदत करतो, पण तोच वारा क्षणार्धात एक छोटीशी ठिणगी देखील विझवतो. म्हणूनच कमकुवत माणसाला मित्र नसतात.

Back to top button