IslamNews

ऑनर किलिंग ? नव्हे हा तर धर्मांध इस्लामी क्रूरतेचा कळस….

The culmination of fanatical Jihadi Islamic brutality….

मुंबईतील गोवंडी येथे आंतर धर्मीय लग्न केलेल्या जोडप्याच्या दुहेरी हत्याकांडाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला ऑनर किलिंगचा (honer killing) मुलामा देऊन रंगसफेदी करण्याचे केविलवाणे प्रयत्न मीडियात सुरू झाले आहेत. करण चौरसिया ( वय वर्षे: २२) आणि गुलनाज (वय वर्षे: २०) असे त्या दोघा दुर्दैवी मृतकांची नावे आहेत.

उत्तर प्रदेशातल्या आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या करण आणि गुलनाज यांचे सूत जुळले आणि त्यांनी गेल्या वर्षी लग्न केले. मग दोघांनी दिल्ली गाठून तेथे आपला संसार थाटला. गुलनाजचा बाप गोरा खान (वय वर्षे: ५०) याला हे नाते मान्य नव्हते. इतके दिवस तो शांत राहिला, पण त्याच्या डोक्यात भयंकर विचार घोळत होते. अखेर त्याने मुलगा सलमान (वय वर्षे: २२) तसेच मोहम्मद सैफ खान (वय वर्षे: १८) व अन्य काहींना सोबत घेऊन मुलगी आणि जावयाला कायमचे संपविण्याचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे गोरा खानने आपल्या मुलीशी संपर्क साधला आणि तिला “गोडीगुलाबीने” मुंबईत येण्यास भाग पाडले. दोघेही मुंबईत आल्यानंतर मुलीची गळा आवळून व तिचा पती करणचा गळा चिरून हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.

या घटनेचे वृत्तपत्रांमध्ये आलेले “ऑनर किलिंग” हे शीर्षक वाचून नंतर बातमी वाचल्यावर सर्वसामान्य हिंदूंच्या मनात काही प्रश्न उभे रहातात…

  • जर मिडिया म्हणते त्याप्रमाणे ते निव्वळ “ऑनर किलिंग” होते तर गोरा खान याने फक्त आपल्या मुलीला, गुलनाजला ठार मारण्याचा जघन्य अपराध केला असता. पण त्याने तसे न करता आपल्या जावयाची “करण”ची देखील हत्या केली. म्हणजे हा निव्वळ “ऑनर किलिंग”चा मामला नाही. त्याच्याही पलीकडे “काहीतरी” आहे. मिडिया काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
  • गोरा खानने करणचा गळा चिरून अत्यंत नृशंस पद्धतीने त्याला संपवले. खुनाच्या पद्धतीतून… गळा चिरण्यातून… गोरा खानला आपली मुलगी एका काफीराबरोबर, त्यातही एका हिंदू बरोबर पळून गेल्याचा “खुन्नस” किती पराकोटीचा होता हे लक्षात येते.
  • आपल्या मुलीने एका काफीराच्या नादी लागून इस्लाम सोडला या नुसत्या कल्पनेनेच बिथरलेल्या गोरा खानने वर्ष दीड वर्ष किती शांत डोक्याने या हत्याकांडाचे नियोजन केले असावे बघा… आपल्या पोटच्या मुलीला गळा आवळून संपवणे हे एका बापासाठी किती कठीण असते पण तिने “इस्लाम सोडला” हा तिचा गुन्हा बापलेकीच्या अतूट नात्याला दफन करायला पुरेसा होता. पर्यायाने ज्याच्यामुळे आपल्या मुलीने इस्लाम सोडला त्या काफीराला देखील एकच शिक्षा होती… सर तन से जुदा.
  • मुलीला “गोड बोलून” दिल्लीहून मुंबईला बोलावून घेतली अर्थात गोरा खानने दोघांच्या हत्याकांडाची वर्ष दीड वर्षात थंड डोक्याने पूर्ण तयारी केली होती. या कटात त्याने आपल्या २२ वर्षांच्या मुलाला, सलमानला आणि अन्य ३ अल्पवयीन मुलांना सामील करून घेतले.सख्ख्या भावाकडून सख्ख्या बहिणीचा गळा आवळून खून होऊ शकतो? कुठून आली असेल ही पराकोटीच्या द्वेषाची उबळ? या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडात अल्पवयीन मुले सामील होतात? काय असावी त्यांच्या गुलजानबद्दलाच्या टोकाच्या द्वेषाची कारणे? तिने इस्लाम सोडला हा तिचा एकमेव अक्षम्य अपराध होता हेच ना?
  • कदाचित करण मुसलमान झाला असता तर त्या दोघांना माफी मिळाली देखील असती पण दोघे दिल्लीला पळून गेले. याचा अर्थ करण मुसलमान व्हायला तयार नव्हता. त्याला आपला धर्म प्रेयसीपेक्षा जास्त प्रिय होता आणि हाच त्याचा अक्षम्य गुन्हा ठरला असावा.

*आणि हा आपला अक्षम्य गुन्हा आहे, या अक्षम्य गुन्ह्याबद्दल आपल्या सोबत दगाफटका होऊ शकतो याची पुसटशी कल्पना देखील करणच्या “सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या निष्पाप निरागस हिंदू मनाला” शिवली नसावी. अन्यथा तो गोरा खानच्या “गोडीगुलाबी”ला भुलून मुंबईला आला नसता आणि किमान बेसावधपणे पत्नीला घेऊन त्याला भेटायला गेला नसता.

*कदाचित पत्नीने, गुलजानने त्याला हा धोका सांगितला असण्याची देखील शक्यता आहे. मात्र करणच्या भोळसट हिंदू मनाला ती शक्यता पटली नसावी. सासरा जावयाला आणि मुलीला ठार मारू शकतो ही कल्पना देखील करणच्या विचारशक्ती पलीकडची होती.

  • दुर्दैवाने एक भोळसट हिंदू इस्लामी कट्टरतेचा बळी ठरला. मिडिया मात्र याला फक्त “ऑनर किलिंग”चा मुलामा देऊन घटनेतील “सत्य” लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

*मीडियाने बातमी आहे तशी द्यावी. त्याला “ऑनर किलिंग” म्हणून आपण न्यायनिवाडा करू नये. जागृत हिंदू समाज वरीलप्रमाणे त्या बातमीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारच आहे.

https://www.indiatoday.in/amp/cities/mumbai/story/mumbai-police-solve-interfaith-couple-murder-while-probing-unidentified-body-2450317-2023-10-17

Back to top button