HinduismNews

दिव्या दिव्या दीपत्कार.. स्वदेशीचा हुंकार..

अनेक वर्षांपासून सरकारची मदत सोडली तर शिल्पकार, हस्तकला, कुटीरउद्योग या गृहउद्योगांकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. या कला जीवंत ठेवण्यासाठी आणि त्यांना देशात-विदेशात मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी रिलायन्स रिटेल दुवा ठरणार इतकं निश्चित..

रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील शिल्पकार आणि कुशल कारागिरांसाठी खास प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तुम्ही शिल्पकार, कारगिर, हस्तकला क्षेत्रातील कुटीरउद्योग अथवा गृहउद्योग चालवत असाल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्या मदतीला येऊ शकतो. रिलायन्सने देशातील पहिले ‘स्वदेश’ स्टोर उघडले आहे. तेलंगाणातील हैदराबादमध्ये हे स्टोअर सुरु झाले. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Retail Opens Swadesh Store) संस्थापक नीता अंबानी यांनी त्याचे उद्धघाटन केले.जुनी हस्तकला, शिल्पकला इतर कला जीवंत ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणावा लागेल.

स्वदेशीचा वापर आवश्यक

भारत आज जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे.बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी वस्तू देशात मोठया प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळे दरवर्षी कोटयवधी रुपये परदेशात जात आहेत. यासाठी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करणे आवश्यक आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढल्यास देशाच्या उत्पन्नाबरोबर रोजगारातही वाढ होईल. उदाहरणच द्यायचे झाल्यास २० रुपयांच्या पेप्सीतील १५ रुपये परदेशात जातात या उलट २० रुपयांचा उसाचा रस , ताक ,लस्सी प्यायल्यास २० रुपये भारतातच राहतात आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदतच होते.

पारंपारिक कला, कारगिरांना होणार मदत..

‘स्वदेशी’ स्टोअरच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भारतीय कला आणि शिल्प यांच्या विक्रीसाठी हा महत्वाचा प्लॅटफॉर्म ठरेल. देशातील लाखो कारागिरांना एक मंच यामुळे उपलब्ध झाला आहे. शिल्पकला हा भारताचा गौरव आहे, त्यासाठी एक मंच उपलब्ध करुन देणे आवश्यक होते, असे नीता अंबानी यांनी सांगितले. ही स्टोअर आता अमेरिका आणि युरोपमध्ये पण उघडण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होईल.

“Hindu rate of growth”

“Hindu rate of growth” कधीकाळी हेटाळणीचा विषय होता. आज त्याच जोरावर भारत आत्मनिर्भर होतॊय. उदाहरणच द्यायचेच झाल्यास धार्मिक पर्यटनामुळे भारताचा GDP ३% ने वाढतो.

Temple economics म्हणजेच..

पर्यटन : एक मोठे मंदिर संकुल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते.निवास, रेस्टॉरंट,पूजा साहित्य तसेच इतर व्यवसायांद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होते.

रोजगार : मंदिर संकुल स्थानिक लोकांना देखभाल, सुरक्षा आणि पर्यटन सेवा यासारख्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो.

सांस्कृतिक परंपरांचे जतन: मंदिर परिसर स्थानिक समुदायाची संस्कृती आणि इतिहास जतन करण्याचे एक प्रमुख केंद्र म्हणून देखील कार्य करते.भारतीय समाजाच्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांना आकर्षित करते.

धर्मादाय : मंदिर परिसर धर्मादाय तथा सामाजिक कल्याणाचे,उत्थानाचे केंद्र म्हणून देखील कार्य करते. हे गरीब आणि बेघर लोकांना अन्न, वस्त्र,निवारा अश्या जीवनावश्यक सेवा प्रदान करते.

आर्थिक विकास: मंदिर परिसर आजूबाजूच्या परिसरात आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणूनही कार्य करते. नवीन पायाभूत सुविधांचा विकास देखील मंदिरामार्फत केला जातो.

Vocal For Local..

या दिवाळीत चीनचे दिवाळे निघाले आहे. व्होकल फॉर लोकल या योजनेचा चीनमधील बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. स्वदेशी वस्तूंची धूम आहे. ग्राहकच नाही तर वितरक पण या दिवाळीत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत आहे. चीनला या देशी स्वॅगचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. चीनचे १ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

सेमीकंडक्टर चिप्सपासून ते सर्व प्रकारच्या गृहउपयोगी वस्तूपर्यंत भारताने चीनवरील अवलंबून राहण्याचे धोरण कमी केले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पामुळे देशातील अर्थव्यवस्थेला मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

एकूणच, ‘स्वदेश’ची कल्पना केवळ दुकाने उघडण्यापुरती मर्यादित नाही. तळागाळात संपूर्ण भारतात 18 RELIANCE FOUNDATION ARTISAN INITIATIVE FOR SKILL ENHANCEMENT (RAISE) स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे 600 हून अधिक क्राफ्ट उत्पादनांसाठी एक शॉपिंग प्लॅटफॉर्म सुविधा प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. स्वदेश स्टोअरमध्ये ग्राहकाला एखाद्या उत्पादनाची संपूर्ण माहिती मिळवायची असल्यास “scan and know” तंत्रज्ञानाची सुविधाही उपलब्ध आहे. ज्याद्वारे प्रत्येक उत्पादन आणि त्याच्या निर्माणामागील गोष्ट देखील आपल्याला जाणून घेता येईल.

https://medium.com/@pathaniahp38/temples-contribute-2-to-3-to-the-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4s-gdp-68e0d9c755e1

Back to top button