News

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग २

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha part 2

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

आपल्याला माहीत आहे की भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि अनेक वर्षे आपल्यावर परकीय सत्ता होती.इंग्रज येण्या आधी काही शतके आपल्या भारतावर मुघलांचे राज्य होते. मुघल हे मुस्लिम शासक असल्याने त्यांनी अनेक ठिकाणची मंदिरे उध्वस्त करून त्या ठिकाणी मशीदी बांधल्या होत्या.
त्यातलीच एक बाबरी मशीद!

सन १५२८ ते सन २०१९ या काळात एकही वर्ष असे सापडणार नाही की ज्यावेळेला हा संघर्ष अस्तित्वात नव्हता. हा केवळ धार्मिक संघर्ष कधीच नव्हता. त्याला प्रारंभापासून राजकीय बाजू होती. ‘राम हा भारताचा धार्मिक व राजकीय मानबिंदू आहे त्याचप्रमाणे हिंदू समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद असलेले सूत्र देखील आहे’ हे वास्तव सर्व धर्मांध, जिहादी मुस्लीम आक्रमकांना माहित होते.

अकराव्या शतकातल्या अल बेरुनीपासून विसाव्या शतकातल्या महंमद अलामा इक्बालपर्यंत अनेक मुस्लीम लेखकांनी ते नोंदवून ठेवले आहे. ‘भारतीय समाजाचा हा मानबिंदू नष्ट केल्याशिवाय आपले राजकीय वर्चस्व खऱ्या अर्थाने प्रस्थापित होणार नाही’ ह्या मानसिकतेतून बाबर ते औरंगजेबापर्यंतच्या मुघल राज्यकर्त्यांनी रामजन्मभूमी नष्ट करण्याचे प्रयत्न वारंवार केले. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय समाजाने सतत कडवा संघर्ष केला आणि रामजन्मभूमी नष्ट होऊ दिली नाही किंवा तिच्यावरचा ताबाही सोडला नाही. प्राणप्रिय अयोध्या कधीही पराजित झाली नाही.

आणि शरयू लाल झाली…

ग्रीकांनी राममंदिर पाडले हजारो वर्षांनंतर रामजन्मभूमीवर झालेले हे पहिले आक्रमण होते. त्यानंतर काही वर्षे कुशाणांचे हल्ले होत राहिले. रामजन्मभूमीला लक्ष्य मानून तेथील मंदिरांवर जो दुसरा हल्ला मुस्लिमांकडून झाला.. मसूद सालार ह्या गझनवी सेनाप्रमुख उत्तर भारत जिंकून अयोध्येकडे निघाला..

खुद्द बाबराच्या काळातच ४ लढाया झाल्या. हुमायूँनच्या काळात १०, अकबराच्या काळात २०, औरंगजेबाच्या काळात ३०, नवाब सआदत अलीच्या काळात ५, नवाब नसिरुद्दीनच्या काळात ३, नवाब वाजीद अली शाहच्या काळात २. अशा १९३४ पर्यंत एकूण ७६ किंवा त्यापेक्षा अधिकच लढाया हिंदू रामजन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले. त्यात जवळपास १० लक्षांहून अधिक हिंदूंनी आपले प्राण गमावले.

त्यापैकी महत्वपूर्ण लढायांची माहिती पुढीलप्रमाणे..

ग्रीक आणि रामजन्मभूमी..

नंद आणि मौर्य वंशापर्यंत रामजन्मभूमीचे वैभव अक्षुण्ण राहिले. कोणालाही तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही. परंतु २५ शतकांपूर्वी युनान प्रांतातून यवनांनी आक्रमण सुरू केले. कोसल देशात जवळजवळ साठ वर्षे लढाई चालू होती. कधी जय होई तर कधी पराजय. पण त्याचा रामजन्मभूमीवर काही परिणाम झाला नाही. नंतर मात्र कोसल राज्याच्या काही भागांवर आणि कोशांबीवर ८०-९० वर्षे यवन शासकांचे राज्य प्रस्थापित झाले. सुमारे २३ शतकांपूर्वी विदेशी ग्रीक राजा मीनांडर याने अयोध्येवर हल्ला केला.

भारतावर ग्रीक सत्ता स्थापन करण्यासाठी मीनांडरने कूटनीतीचा आश्रय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यावेळी या देशात बौद्धांचा प्रभाव बराच वाढला होता. बौद्ध लोकांची मदत मिळवण्यासाठी वरकरणी बौद्ध धर्माचा अंगीकार केला. त्याला वाटले की, जोपर्यंत रामजन्मभूमीवर मंदिर उभे असेल तोपर्यंत ते कोसलाच्या प्रजाजनांना आणि हिंदूंना देश आणि धर्म यासाठी प्राणही देण्याची प्रेरणा देत राहील, म्हणून त्याने मोठे सैन्य जमा करून लवकुशांनी निर्मिलेले रामजन्मभूमीवरील प्राचीन मंदिर बलप्रयोगाने पाडून टाकले. हिंदूंनी या हल्ल्याला प्रखर विरोध केला खरा पण मीनांडरचे सैन्य जास्त असल्यामुळे ते टिकू शकले नाहीत.

हजारो वर्षांनंतर रामजन्मभूमीवर झालेले हे पहिले आक्रमण होते. परंतु ग्रीकांना मिळालेला जय अधिक काळापर्यंत टिकू शकला नाही. या आक्रमणामुळे हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का बसला. सारा हिंदू समाज संतापाने पेटून उठला, मीनांडरला रामजन्मभूमी आक्रांत करून पुरे तीन महिनेही झाले नाहीत तोच शुंगवंशीय राजा द्युमत्सेन याने इसवीसन पूर्व १५० व्या वर्षी त्यावर पूर्ण सामर्थ्यानिशी प्रतिप्रहार केला आणि त्याच्या राजधानीवर म्हणजे कोशांबीवर स्वामित्व मिळवले. या युद्धात मीनांडर मारला गेला. जागृत हिंदू समाजाने अशा रीतीने लवकरच रामजन्मभूमीच्या अपमानाचा यशस्वी प्रतिशोध घेतला.

त्यानंतर काही वर्षे कुशाणांचे हल्ले होत राहिले. आणखी एका प्रबळ विदेशी शक्तीशी संघर्ष सुरू झाल्यामुळे रामजन्मभूमीवर राममंदिराचे पुनर्निर्माण कार्य काही काळ अवरुद्ध झाले. बराच काळ रामजन्मभूमी मंदिर विनाशावस्थेत राहिले, तरीही भाविक हिंदू जनता तिच्या अवशेषांजवळ असलेल्या एका झाडाच्या खाली रामाची पूजा करीतच राहिली.

क्रमशः

Back to top button