News

सुरक्षित किनारपट्टी – समृद्ध भारत..

शिव शंभू विचार मंच आणि सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान मुंबई-अलिबाग-दापोली-रत्नागिरी-विजयदुर्ग असा प्रवास आपण शिडाच्या बोटीने आणि ट्रॉलर्स बोटीने करणार आहोत.

सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत संघटन मंत्री अनिकेत जी कोंडाजी यांनी “सागरी सुरक्षा शिडनौका परिक्रमे”बद्दल दिलेली माहिती पुढीलप्रमाणे..

१. सागरी सीमा मंच बद्दल आपण काय सांगाल?

• १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्पोट नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने हे काम सुरू झाले किनार पट्टी वरती. १९९३ चा बॉम्ब स्पोट आठवला की आजही आपल्या अंगावर शाहारे येतात. ती जी मालिका सुरू झाली बॉम्ब स्पोटची ती २६/११/२००८ चा हल्ल्या पर्यंत. आपण जर पुन्हा मागे गेलो तर लक्षात येईल हे हल्ले कोणी केले? कशा करीत केले? बलाढ्य भारतीय नौदल, तटरक्षक दल असतांना सुद्धा हल्ला कसा झाला?

• एक प्रश्न पडतो की आमच्या बांधवांचे इथलं काम काय? आमचे बांधव सजक आहेत का? जागरूक आहे का? हा मोठा प्रश्न नेहमी आपल्या समोर येतो, त्याचे कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठा अरमारचा इतिहास विसरत चाललो म्हणून सुरक्षित किनारपट्टी – समृद्ध भारत या संकल्पाने वरती आपण सागरी सीमा मंचाचे कार्य सुरू केले.

• यामध्ये जनजागृतीसाठी मराठा आरमार दिवस, मत्स्य जयंती, नारळी पूर्णिमा सारखे पारंपरिक सन आहेत, भारत माता पूजन, रक्षाबंधन आहे. या माध्यमातून समजामधील मच्छीमारांमध्ये मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे, विविध अभ्यासक्रम आपण तयार केलेत व त्या माध्यमातून सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण, तिथल्या विषयाच्या गांभीर्य लक्षात घेऊन त्या विषयावर चिंतन व्हावे म्हणून आपण अभ्यासगट तयार केले. ज्या मधून पॉलिसी बनविण्यासाठी मंडळी, मच्छीमार समाजातील मंडळी त्या टिम मध्ये आहे.

• एकूणच सुरक्षित किनारपट्टी – समृद्ध भारत या संकल्पाने सागरी सीमा मंचाचे कार्य सुरू झाले.

२. आतापर्यंत कोणालाही न सुचलेली संकल्पना सागरी सीमा मंचला कशी सुचली?

• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला २०२३-२४ मध्ये ३५० पूर्ण झाले. विवध उपक्रम शासन, प्रशासन, संस्था द्वारे करण्यात येत आहे. सागरी सीमा मंच सुद्धा मराठा आरमाराचे शिलेदार आहे जसे मायनाथ भंडारी, कान्होजी अंग्रे, रामा पाटील अशे अनेक आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी सर्वोच् बलिदान दिले अशांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे. आरमारा मधले विविध घटक आहे त्याची मांडणी करणे कारण आपल्याला आरमारा विषई फार कमी शिकवल्या गेले त्यामुळे याची जनजागृती खूप कमी राहिली. म्हणून या आरमाराचे काही भाग जे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सर्व जातींना एकत्र घेऊन मराठा आरमारा स्थापन करून आपली सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याचे कार्य केले.

• ही किनारपट्टी सुरक्षित ठेवण्या करीत इथला मच्छीमार बांधव, अंग्रे कोळी बांधव, आरमारा मध्ये घेतलं. या आरमारा मध्ये विविध संकल्पना आल्यात जसे जलदुर्ग, बूर्ज, लढाई, व्यापाराचे दळणवळण छत्रपती शिवाजी महाराजांनी साबूत राखले व हे दाखवून दिले की आमची किनारपट्टी ही समृद्ध आणि सुरक्षित आहे.

• हा आपला इतिहास जनसामान्य पर्यंत पोहोचाव म्हणून सागरी परिक्रमाची संकल्पना आली.
• सागर परिक्रमा काय आहे? तर शिडाच्या बोटीने प्रवास करणे. मग आरएसएस च्या प्रेरणेने चालत असलेले काम, शिव शंभू विचार मंच आणि सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान मुंबई-अलिबाग-दापोली-रत्नागिरी-विजयदुर्ग असा प्रवास आपण शिडाच्या बोटीने आणि ट्रॉनस बोटीने करणार आहोत.

• या प्रवासादरम्यान स्थानिक समाजामध्ये सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण या विषयावर मांडणी करून जनजागृती करणार आहोत.
• आपल्या या मोहिमेत शासन आहे, भारतीय तटरक्षक दल आहे, महाराष्ट्र पोलिस आहे, विविध सेवाभावी संस्था आहेत, यांच्या सहयोगाने आपण यामध्ये विविध उपक्रम करणार आहोत.

३. या मोहिमेतून आपल्याला काय साध्य करायचे आहे?

• या मोहिमेतून जलदुर्गाचा अभ्यास, किनारपट्टीचा अभ्यास, तिथल्या बांधवांचा व समाजाचा अभ्यास करून आपली सागरी सीमा सुरक्षित कशी करता येईल यावर विचार-विनिमय करून शासन दरबारी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण सागरी क्षेत्रात अशे काही पॉईंट्स आहेत जिथून सुरक्षा भेदता येते.
• या मार्गाने मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतो. काही महिन्यांपूर्वी संशइत बोट सापडली होती. त्यामुळे या भागात जनजागृती करणे आम्ही महत्वाचे समजतो.

धन्यवाद!!

Back to top button