National SecurityNaxalismNews

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माओवाद्यांचे विध्वंसक मनसुबे उध्वस्त..

four naxalites killed in encounter with security forces in maharashtra gadchiroli

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला

गडचिरोली पोलीस व माओवादी झालेल्या चकमकीत चार जहाल माओवादी ठार यामध्ये दोन डीव्हीसिएम (Divisional Commitee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश…

महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस

दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. याच निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आलेले आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व 05 कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 04 पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. त्यांची प्राथमिक ओळख पटविण्यात पोलिस प्रशासनाला यश मिळाले आहे.

1) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय 28 वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती
2) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय 32 वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती
3) कुरसंग राजू, प्लाटून सदस्य
4) कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य अशी नावे आहेत.

वरील सर्व माओवाद्यांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाने एकुण 36 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. यासोबतच घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 02 नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

लेखक :- अशोक बाबुराव तिडके (विवेक विचार मंचप्रांत समन्वयक पश्चिम महाराष्ट्र)

Back to top button