HinduismIslamNews

विकृतांचा विकृत इतिहास…

हिंदुस्तानवर दीर्घकाल राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी आमच्या गौरवशाली इतिहासाची पूर्ण मोडतोड केली होती… हूण, कुशाण, शक, यवन या परकीय आक्रमकांना रणांगणात पराभूत करून… मागे राहिलेल्या आक्रमकांना आमच्या संस्कृतीत आणि समाज जीवनात एकरूप करून… आम्ही आमच्या क्षात्रतेजाचा तसेच सर्वसमावेशक संस्कृतीचा जगाला परिचय दिला होता…

आक्रमणकारी परकीय मुघलांशी आम्ही प्राणपणाने लढलो… त्यांचे शासन आम्ही कधीच मान्य केले नाही… शक्य तेथे शक्य त्याकाळी हिंदू समाजाने मुघलांशी निकराचा लढा दिला…

या प्रदीर्घ संघर्षात आम्ही काही लढाया जिंकलो… काही लढाया हरलो… परंतु रणांगण सोडले नाही आणि अंतिम विजयाच्या जिद्दीने हा प्रदीर्घ संघर्ष केला…
आमचा हा क्षात्रतेजाने रसरसलेला इतिहास विकृत स्वरूपात ब्रिटिशांनी आम्हाला शिकवणे हे त्यांच्या दृष्टीने तर्कसंगत होते… कारण आमच्या दैदीप्यमान संघर्ष गाथेने आम्हाला आत्मभान आले असते तर ब्रिटिशांना या देशावर एक दिवस देखील राज्य करणे शक्य झाले नसते…

म्हणून ब्रिटिशांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाला शिपायांचे बंड (Mutiny) म्हटले… आपल्याच राज्यकर्त्यांविरोधात उठाव केला जातो त्याला बंड म्हणतात… परकीयां विरुद्ध केले जाते ते स्वातंत्र्य युद्धच असते… हे ठामपणे सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना “१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध” हे पुस्तक लिहावे लागले…

दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर देखील आम्हाला आमचा खरा इतिहास कधीच शिकवला गेला नाही… शिकवला गेला तो आमच्या पराभवाचा… आक्रमकांच्या विशेषतः मुघलांच्या उदात्तीकरणाचा इतिहास…

उदाहरणार्थ…

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान भेटीच्या वेळी अफजलखानाने कपटाने कट्यार चालवली म्हणून वाघनखे खुपसून त्याचे पोट फाडले असा खोटा इतिहास शिकवला जातो… शिवरायांनी अफजलखानाला फाडण्यासाठीच प्रतापगडावर गोड गोड बोलून खेचून आणले होते… अफजलखानाने कट्यार चालवली असती किंवा नसती… तरी महाराजांनी त्याला फाडलाच असता हा खरा इतिहास आहे…

स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे आम्हाला असाच खोटा आणि विकृत इतिहास शिकवला गेला…

विशेषतः डाव्या आणि पुरोगामी इतिहासकारांनी लिहिलेला आमच्या देशाचा हा विकृत इतिहास होता… त्यासाठी कोणतेही तथ्य अथवा कागदोपत्री पुरावे देण्याची तसदी सुद्धा या लाल इतिहासकारांनी घेतली नाही… हिंदूंचा तेजोभंग करण्यासाठी आपल्या सोयीने तद्दन खोटा इतिहास लिहून आम्हाला शिकवला गेला…

२०१४ राष्ट्रीय विचारांचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले आणि त्यांनी आपल्या देशाचा खरा (Rational) इतिहास शिकवण्याचे ठरविले… हा इतिहास तथ्य आणि कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे लिहिलेला आहे…

यावर्षी NCERT ने शालेय अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचे ठरवले…

त्याबरोबर स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मंडळींचे पित्त खवळले…

त्यापैकी एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून आपली मळमळ बाहेर काढली…
त्यांनी ट्विट मध्ये मुघलांच्या इतिहासाबद्दल इतकी खोटी माहिती बिनदिक्कतपणे दिली आहे की आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो…

पानीपताचे (panipat) पहिले युद्ध १५२६ साली… इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये झाले…
दुसरे युद्ध १५५६ साली… सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुगल सम्राट अकबर यांच्यात झाले…
आणि तिसरे युद्ध १७६१ साली… मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये झाले…

मग हे १५९२ चे पानिपत युद्ध कुठले आणि कोणामध्ये झाले?

बाबराचा मृत्यू १५३० साली झाला तर १५९२ साली तो पानिपतावर कसा लढला? इब्राहिम लोधीवर नाराज असलेल्या दौलत खान लोधीने बाबराला आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले असा इतिहासात स्पष्ट दाखला आहे. याचा अर्थ राजा संग्रामसिंहाने बाबराला आक्रमण करण्यासाठी निमंत्रण दिल्याचा धडधडीत खोटा इतिहास सांगितला जात आहे.

याच्या बरोबर उलट त्या काळचा सर्वात शक्तिशाली राजा संग्राम सिंह याचा आपल्या तोफखान्याच्या मदतीने पराभव केल्यानंतर बाबराला खऱ्या अर्थाने विजय मिळाला असेही इतिहासात कागदोपत्री नमूद केलेले आहे. (पुराव्याची प्रत सोबत जोडली आहे.)

राजा संग्राम सिंह हे महाराणा प्रताप यांचे आजोबा हे नाते सांगताना महाराणा प्रतापांच्या घराण्याचा घोर अपमान करण्यात आलेला आहे… परकीय आक्रमकांशी झुंज देणारे महाराणा प्रताप हे राष्ट्रपुरुष आहेत… अगदी छत्रपती शिवरायांसारखेच… त्यांच्या पूर्वजांचा जाणून-बुजून केलेला अपमान या देशातील राष्ट्रप्रेमी जनता कदापि सहन करणार नाही…

खोटेपणाला देखील काही मर्यादा असते…

मात्र आता तो खोटा नाटा इतिहास सांगण्याचा काळ गेला… हे मोबाईल युग आहे… इथे तुम्ही खोटेपणा केलात की, हा सूर्य आणि हा जयद्रथ या न्यायाने… तुमचा खोटेपणा तात्काळ उघडा पाडला जातो… याची जाणीव झाल्याबरोबर हे ट्विट डिलीट करण्यात आले…

ट्विट डिलीट करणे हा आपल्या खोट्या इतिहासाचा सज्जड पुरावाच आहे… पुढच्या वेळी असा खोटा इतिहास सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी डाव्या व पुरोगामी इतिहासकारांनी… राष्ट्रीय विचारांचे इतिहासकार तुमचा खोटेपणा उघडा पाडायला तयारच बसले आहेत याची खात्री बाळगावी…

Back to top button