NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ३

नक्षलवादी चळवळीचा उदय

प्रथमतः भारतामध्ये नक्षलवादी चळवळ १९६७ मध्ये प. बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील ‘नक्षलबारी'(naxalbari movement) या गावात जन्माला आली. त्यामुळे नक्षलबारी या गावाच्या नावावरच ही चळवळ ओळखली जाऊ लागली. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या “सिलिगुडी’ विभागात आणि हिमालयाच्या पायथ्याशी २०७ चौ. कि. मी. चा नक्षलवादी प्रदेश आहे. या भागात एकूण ६० खेड्यांचा अंतर्भाव होतो. तेथील बव्हंशी वस्ती संथाळ, ओराओं, मुंडा आणि राजवंशी या आदिवासी जमातींची आहे. मे १९६७ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नक्षलवादी शाखेने मध्यवर्ती पक्षाचे आदेश डावलून येथे आदिवासीचा सशस्त्र उठाव केला. ही नक्षलवादी उठावाची सुरुवात होती. “सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’ आणि ‘माओ-त्से-तुंग हे आमचे प्रमुख’ या त्यांच्या घोषणा आणि चिनी सरहद्दीची समीपता यामुळे नक्षलवादी उठावाकडे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले. या उठावामागील विचारप्रणाली नक्षलवाद म्हणून ओळखली जाते.

२ मार्च १९६७ रोजी प. बंगालमधील “नक्षलबारी गावात पोलीस आणि जनसमूह यांच्यात संघर्ष झाला त्यामध्ये एक आदीवासी युवक मारल्या गेला, त्यामधून नक्षलवादी चळवळीची ठिणगी पडली. या नव्या क्रांतिकारी पक्षाचे केंद्र उत्तर बंगालमधील ‘नक्षलबारी’ या गावात होते. त्यावरून पुढे या विद्रोही दहशती गटाला मग ‘नक्षलवादी गट’ असे संबोधण्यात येऊ लागले. ‘नक्षलवाद’ या नावाला तात्त्विक अर्थ नाही, परंतु नक्षलवादी या लक्ष्याला अन्याय, जुलूम, शोषणाविरुद्ध सशस्त्र विरोधात लढा असे रूप प्राप्त झाले; त्यामधून जुलूमों, निष्क्रीय राज्यकर्ते, भ्रष्ट शासकीय अधिकारी व पोलिस विभागातील लोकांची हत्या आदी या जहाल गटाकडून होऊ लागली व दहशतीचे नवे आंदोलन या चळवळीने प्रस्थापित केले. या चळवळीचे प्रणेते ‘चारू मुजुमदार’ यांच्याच गावात जमीनदाराकडून आदिवासींच्या आणि शेतमजुरांच्या होणाऱ्या अनन्वित छळाच्या समस्याचे भांडवल करून त्या विरोधातून ही चळवळ उदयास आणली.

नक्षलवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समूहाने अन्याय, अत्याचार, जुलूम शोषणाविरुद्ध सशस्त्र लढा सुरू केला. त्या गावाचे हे लोण अवतीभवतीच्या गावातील तरुणांमध्ये पसरू लागले आणि नक्षलबाडीच्या लगत असलेल्या ‘बडा मणीराम ज्योत’ या गावातील काही तरुणानी तांदूळ- लुटून शेजारच्या नेपाळ देशात नेऊन बिकला. ही घटना नक्षलगंडाची सुरुवात होती. पुढे बाजूच्याच ‘नागण ज्योत’ या गावात तेथील नागरॉय चौधरी याची हत्या नक्षलवाद्यांनी केली. नागरॉय चौधरीची हत्या नक्षलबाडी गावात झाल्यामुळे बंडाळी करणाच्या लोकांनाच ‘नक्षलवादी‘ या नावाने ओळखले जाऊ लागले. तसेच नक्षलवाद्यानी आपल्या हिंसाचारी कारवायांना माओवादाचा तात्विक आधार दिला.

माओ-त्से-तुंग यांचा विचार मानणान्या नेत्यांनी सुरुवातीला ही नक्षलवादी चळवळ चालवली. त्यामुळे या चळवळीत वापरल्या गेलेली शस्त्रे पारंपरिक होती; कारण हा लोकांचा लढा असल्याने, सामान्य जनतेकडे जी परंपरागत शस्त्रे असतील त्यांनीच हा लढा लढायचा, असा माओने घालून दिलेल्या दंडकातील एक दंडक आहे. पश्चिम बंगालमधील ‘दार्जिलिंग जिल्ह्यात १९६७ साली जेव्हा चारू मुजूमदार, कानु संन्याल, जंगल सबाल यांनी अशा प्रकारे उठाव केला, नोव्हेंबर १९६८ मध्ये तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, ओरिसा आणि प. बंगाल राज्यातील कार्यकत्यांना एकत्रित करून अति इंडिया कॉनिनेन्स कमिटी ऑफ कम्युनिस्ट रिव्हेलंटरी (AICCCR) स्थापना करून कामरेड सुनिल कुमार रॉय यांना समन्वयक बनविले. त्या वेळी परंपरागत शस्त्र म्हणून भाला, कुन्हाडी आणि तीरकामठा यांचा मुक्तपणे वापर केला होता. ही हत्यारे बंगाल भागातील संन्याल, कोरनन्स, मुंडा या आदिवासींची पारंपरिक हत्यारे होती, जंगल संचालने तर त्या काळात तीरकामठ्यांची प्रशिक्षण केंद्रेही सुरू केली होती.

AICCCR

परंतु लवकरच वरील प्रकारच्या पारंपरिक शस्त्राची मर्यादा लक्षात आली. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार हत्यारांमध्ये बदल केला गेला, तेव्हा नक्षलवादी बंदुकीचा वापर करू लागले, पोलिसावर आक्रमण करून त्यांच्याकडून बंदुका पळविण्याचा मार्ग आजही नक्षलवादी वापरतात, जो माओच्या क्रांतीचा एक मार्ग आहे. माओच्या मते, ‘नक्षलवाद्यांचे खरे शत्रू हे त्यांच्या चळवळीच्या मध्ये जो कुणी विरोधी हस्तक्षेप करेल, तो नक्षलवाद्यांच्या चळवळीचा शत्रू आहे. या धारणेमुळेच नक्षलवादी खालील लोकांना आपले शत्रू मानतात.

(१) पोलिस यंत्रणा सध्या नक्षलवादी चळवळीचा बीमोड करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे नंबर एकचा शत्रू पोलीस आहे.
(२) पोलिसांना माहिती पुरविणारे खबरे नंबर दोनचे शत्रू आहेत.
(३) या व्यवस्थेतील जमीनदार, सावकार, आमदार, खासदार, स्थानिकः स्वराज्य संस्थेतील जनप्रतिनिधी, पोलिस पाटील, तिसऱ्या नंबरचे शत्रू आहेत.
(४) भांडवली उद्योग, खाणमाफिया याना चौथ्या नंबरचा शत्रू मानतात.

देशात ठिकठिकाणी स्थानिक प्रश्नांवर असंतोष भडकवीत ठेवायचा आणि योग्य वेळ येताच, एकत्रित उठावाची घोषणा करायची अशी रणनीती (माओवादी) नक्षलवादी चळवळीकडून वापरली जाते. नक्षलवादी चळवळ प. बंगालच्या किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशांतून देशभरातील आदिवासी-मागासबहुत भागात अति दुर्गम असणाऱ्या आणि समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या शोषित आणि उपेक्षित भागांकडे वाढत गेली. ही चळवळ पुढे पं बंगालमध्ये तीन वर्ष टिकली. या हिंसाचारात हजारोंचे बळी गेले.

पं. बंगालमधील १९६७ च्या पहिल्या उठावानंतर दुसरा उठाव नोव्हेंबर १९६८ मध्ये आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम’ भागात करण्यात आला. अनेक तरुण चळवळीत सामील झाले. एप्रिल १९६९ मध्ये आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम, पार्वतीपुरम, ओरिसामधील कोटापुर, बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही भागांत हिंसक आंदोलने होत होती.

१९६९ साली उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ इत्यादी राज्यात अस्तित्त्वात आलेल्या नक्षलवादी गटांना एकत्र करून चारू मुजुमदार यांनी मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. मुख्यत प्राथमिक क्षेत्रातील शोषित शेतकन्याच्या द्वारा ग्रामीण भागात सशस्त्र बंड करून सत्ता प्रस्थापित करणे, हे या पक्षाचे ध्येय होते. संसदीय कार्यपद्धतीला तसेच जनसंघटना व जनआंदोलन यांना त्यांचा तीव्र विरोध कारणे तसेच माओ-त्से-तुंग आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष याच्याशी संपूर्ण एकनिष्ठ राहणे व माओच्या विचारानुसार भारतात क्रांती करणे, ही नक्षलवादाची प्रमुख तत्त्वे होती. १९७० मध्ये पक्षाचे कोलकाता येथे पहिले अधिवेशन भरले पार्टीचे सरचिटणीस म्हणून चारू मुजुमदार यांची एकमताने निवड झाली, कानू सन्याल व जंगल संथाल यांच्या सहकार्याने ही नक्षलवादी चळवळ देशभर पसरली. या नक्षलवादी संघटनेचे चीनने स्वागत केले, तर इंग्लंड, अल्जेरीया, श्रीलंका या देशांतील मार्क्सवादी-लेनिनवादी गटांनी आपला पाठिंबा दर्शविला.

नक्षलवादी चळवळीने तिसन्या टप्प्यात ग्रामीण भागात ‘लाल तळ’ स्थापन करणे व वर्गशत्रूंचा निःपात करण्याचे काम हाती घेतले (वर्गशत्रूंचा निःपात म्हणजे जमीनदार आणि पोलीस सहायकांचा खून करणे). त्यांनी आदिवासींच्या वस्त्या डेन्ना, गोपीबड़बपूर (प. बंगाल) या भागात उठाव केला. त्यांची तथाकथित जमीन पथके स्वतंत्ररीत्या कार्यरत होती. चारू मुजूमदार यांच्या मते, देशाचा प्रत्येक कोपरा ज्वालामुखीसारखा खदखदत असून त्याचा केव्हाही उद्रेक होऊ शकती देशात बंडखोरी केव्हाही उफाळून येऊ शकते. यासाठी आपण संशय लढा सुरू केला पाहिजे, असे आवाहन केले. त्यांची प्रचीती आए प्रदेशात श्रीकाकुलम, प. बंगालमधील डेब्रा, गोपाबलबपुर, बिहारमधील मुशाहिरी, उत्तरप्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील पालिया येथे झाली. तेव्हा नक्षलवाद्यांनी १९७० ते १९७१ च्या कालखंडात हिंसाचाराचे सर्वोच्च टोक गाठले होते.

नक्षलवादी चळवळीचा चौथा टप्पा साधारण एक वर्ष टिकला. भारतीय संविधानात्मक लोकशाही विकासाचे मॉडेल उध्वस्त करणे त्यासाठी या कालखंडामध्ये हिंसाचारासाठी पुढील पद्धती अवलंबिली होती :-

१) १९७० च्या दशकात शाळेवर छापा घालून नासधूस करणे,

२) परीक्षेवर बहिष्कार टाकणे,

३) मान्यवर नेत्यांच्या पुतळ्यांचा विध्वंस करणे,

यासारखे कार्यक्रम नक्षलवाद्यांनी हाती घेतले होते. तसे वर्गशत्रूंच्या निःपात धोरणाने अनेक निःशस्त्र पोलिस, लहान व्यापारी, राजकीय विरोधक यांचे खून करण्याचे सत्र सुरू केले. कोलकात्यामधील काही भागांत ‘आपली मुक्तता क्षेत्रे’ (autonomous region) स्थापन करून तेथून सर्व विरोधकांची हकालपट्टी सुरू केली. काही विद्यार्थी व माओवादी गटाने नक्षलवादी चळवळ आपल्या ताब्यात घेतली.

केंद्र सरकारने नक्षलवादी चळवळीची दखल घेत ही चळवळ संपविण्यासाठी ‘ऑपरेशन स्टिपलचेस’ सुरू केले. कारण पुढे १९७०- ७१ च्या दरम्यान नक्षलवादी हिंसा सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. तिचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा या सारख्या नक्षलप्रभावित राज्यांमध्ये १ जुलै ते १५ ऑगस्ट १९७१ च्या दरम्यान ‘ऑपरेशन स्टिपलचेस’ हे अभियान राबविले. तेव्हा केंद्रिय राखीव दल व स्थानिक पोलिसांच्या मदतीने नक्षल प्रभावीत भाग पिंजून काढून संशयित नक्षलवाद्यांना अटक केली.

मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व शस्त्रास्त्रे पश्चिम बंगालमधील मिदनापूर, बरद्वान, पुरुलिया, वीरभू जिल्ह्यांत बिहारमधील सिंगभूम धनबाद, संथाल परगण्यांत ओरिसामधील मयूरभंज येथे हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलिस प्रशासनाला अपेक्षित प्रमाणात यश प्राप्त झाले नाही, परंतु नक्षलवादी चळवळीमध्ये चारू मुजूमदारच्या भूमिकेमुळे याच काळात फूट पडली. उदा. बिहारमधील नक्षलवाद्यांनी पक्षातून अंग काढून घेतले, श्रीकाकुलममधील नक्षलवाद्यांनी पक्षनेतृत्वाचा धिक्कार केला, तर पश्चिम बंगालमधील सुशीत रॉय चौधरी यासारखे पुढारी भ्रमनिरास होऊन चारू मुजूमदारपासून लांब गेले. एकंदरीत सर्व राज्यांमध्ये असलेली एकसूत्रता या दरम्यान विस्कळीत झाली. गटामध्ये आपआपसांत सशस्त्र संघर्ष झाले. अनेक नेत्यांना अटक झाली. परंतु याच काळात पंजाबमध्येही नक्षलवाद्यांनी जोर धरलेला होता.

operation steeplechase

परंतु पोलिसांच्या ‘ऑपरेशन स्टिपलचेस’ मुळे चळवळ काही प्रमाणात कमजोर झाली असली, तरी या अभियानादरम्यान चारू मुजूमदारला अटक करता आली नाही. ‘ऑपरेशन स्टिपलचेस’ अभियान संपल्यानंतर कलकत्ता पोलिसांच्या गुप्तहेरांनी चारू मजूमदार यांना १० जुलै १९७२ रोजी अटक केली. त्यानंतर काही दिवसांत मजुमदार यांचा कोलकात्यामधील ‘लाल बझार’ तुरुंगात मृत्यू झाला.

१९७२ मध्ये चारू मुजूमदारच्या मृत्यूनंतर महादेव मुखर्जी आणि शर्मा यांच्याकडे नक्षली चळवळीच्या केंद्रीय समितीचे नियंत्रण प्रस्थापित झाले. यांनीच तेव्हा नक्षलींचे सशस्त्र संघटन प्रभावी करून शासन आणि श्रीमंत जमीनदार वर्गावर खुनीहल्ले केले. परंतु पोलिसी कारवाईमुळे दीर्घकाळ ही स्थिती राहू शकली नाही. १९७३ च्या दुसऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओईस्ट-लेनिनीस्ट) द्वारे पश्चिम बंगालमधील भरदान जिल्ह्यात अधिवेशन घेऊन कमळापूर हे गोरिला सशस्त्रदलाचे केंद्र प्रस्थापित केले. महादेव मुखर्जी यांचे नेतृत्व केंद्रस्थानी ठेवून बिहार, आंध्रप्रदेश, अंदमान-निकोबार, पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, तामिळनाडू या राज्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओईस्ट- लेनिनीस्ट) चळवळीचे कार्य भूमिगत पद्धतीने रॅलीचे आयोजन करणे असे कार्य चालू ठेवले.

( क्रमशः )

Back to top button