NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग १

नक्षलवाद (naxalism) ही देशाच्या एकतेला आणि अखंडतेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे, याचे असंख्य पुरावे नक्षलवाद्यांच्या प्रकाशित साहित्यातून समोर येत आहेत आणि तरीही त्यांची बाजू घेऊन भांडणारा तथाकथित बुद्धिवाद्यांचा मोठा वर्ग या देशात आहे, हे या देशाचे दुर्भाग्य… इथल्या लोकशाही राज्यव्यवस्थेचे सर्व फायदे पदरात पाडून घेत, रक्तरंजित क्रांतीची स्वप्ने पाहणाऱ्यांची पाठराखण करणे हा विरोधाभास आहे, हे या तथाकथित बुद्धिमंदांच्या लक्षात येत नसेल का?

भारतातील नक्षलवादी चळवळ जगातील चौथ्या क्रमांकाची दहशत पसरवणारी संघटना असल्याचे २०१८ च्या अहवालात अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.दहशतवादाबरोबरच नक्षलवाद हेदेखील देशापुढील एक मोठे आव्हान मानले जाते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढील नक्षलवाद हे महाकाय आव्हान असल्याचे विधान केले होते.नक्षलवादी चळवळ भारतातील २८ घटकराज्यांपैकी १२ घटक राज्य नक्षलवादाने प्रभावित झाल्याने देशांतर्गत सुरक्षिततेचा सर्वात भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.

नक्षलवाद म्हणजेच माओवाद !!

माओवादाच क्रौर्य आणि चीनशी असलेला संबंध लपवण्यासाठी त्याला नक्षलवाद असं नाव देण्यात आलं. प्रत्यक्षात नक्षलवादाची स्वतःची वेगळी अशी विचारसरणी नाही माओची विचारसरणी हीच नक्षलवादाची विचारसरणी !!

Naxalism

गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करणं ही फक्त धूळफेक …प्रत्यक्षात राजकीय सत्ता मिळवणं हे माओवाद्यांचं अंतिम उद्दीष्टं ! आणि तेही निवडणुकीच्या मार्गाने नाही तर हिंसेच्या मार्गाने ‘Power flows through the barrel of gun’ .. हे त्यांचं ब्रीदवाक्यं आणि “लाल किल्ले पे लाल निशान” हेच अंतिम ध्येय !! त्यासाठी वाट्टेल तेवढी हिंसा आणि दडपशाही केल्याची उदाहरणं आजही आपल्या समोर आहेत.

खऱ्या अर्थाने मागील २०-२५ वर्षात ही चळवळ देशभरातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला प्रभावित करणारी ठरली आहे, संपूर्ण लोकशाही व्यवस्थेची पाळेमुळे खिळखिळी करणारी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या एका लहानशा खेड्यात जन्माला आलेल्या या चळवळीने देशातील २०-२२ टक्के प्रदेशावर आपली दहशत प्रस्थापित करीत वाटचालीचा रोख जंगलाकडून गावाकडे अन् गावाकडून शहर आणि आता महानगराकडे वळवला आहे.

Urban Naxals

राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सुरक्षा यंत्रणांचीच जबाबदारी नसून सर्वसामान्य नागरिकांनी त्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे. माओवाद महाविद्यालयं आणि वस्त्यांपर्यंत येऊन पोहोचलाय…रात्र वैऱ्याची आहे. आपण सजग रहायला हवं ..

(क्रमशः)

पुढील भागात समजून घेऊया नक्षलवाद म्हणजे काय..

Back to top button