IslamOpinion

ब्रिटिश राजाच्या साम्राज्यावर हिरवी चादर..

जेव्हा समाजात विषमता निर्माण होते, तेव्हा त्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही.

इंग्लंड आणि वेल्समध्ये ख्रिश्चन म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांची संख्या प्रथमच लोकसंख्येच्या निम्म्याहून कमी झाली आहे.ब्रिटिश सांख्यिकी कार्यालयाने (Office for National Statistics (ONS)) 2021 च्या जनगणनेच्या आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.ख्रिश्चनांमध्ये 59.3% (2011) वरून 46.2% (2021) पर्यंत अंदाजे 13% घसरण झाली आहे. मुस्लिम 4.9% (2011) वरून 6.5% (2021) पर्यंत वाढले आहेत. तथापि, ख्रिश्चनांच्या पतनाला कारणीभूत असलेला मुख्य घटक म्हणजे “कोणताही धर्म” नसलेल्या 12% लोकांची वाढ,25.2% (2011) ते 37.2% (2021).झाली आहे

लोकांचा ख्रिश्चनिटी वरचा विश्वास उडालाय पण का ?

आज सगळा ख्रिस्त धर्मच पगारी (paid सर्विस ) झाला आहे.फादर,नन्स किंवा एकंदरीतच चर्चचा सगळा सेवकवर्गच पगारी आहे. त्यांना धर्माचे काही घेणे -देणे नाही. फक्त सेल्समन सारखा धर्मप्रसार करावयाचा आहे. लहान मुले /नन्स /महिला यांचे चर्च मध्ये मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते.मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जाते.भोगविलासासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली जाते.राजकारणात चर्चचा हस्तक्षेप मोठ्याप्रमाणात आहे.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यूरोपातील बिघडलेली सामाजिक,आर्थिक,वैचारिक, संस्कृती…

प्रत्येक गोष्टींमध्ये धर्माचे अवडंबर जेव्हां वाढते तेव्हा धर्मावरचा विश्वास उडायला लागतो.:- Charles Darwin

कोणताही समाज कितीही प्रगत का असेना, पण एक वेळ अशी येते की त्या समाजाचा ऱ्हास सुरू होतो.त्या ऱ्हासापासून ते स्वतःला वाचवण्यास असमर्थ ठरतात.

मुख्यत्वे म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या जवळपास ४४% ने वाढली आहे, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात मुसलमान सुनियोजित षडयंत्राद्वारे ब्रिटनमध्ये येत आहेत. भारीच भर म्हणून सीरियातील गृहयुद्धामुळे संपूर्ण युरोपने आणि त्याबरोबर ब्रिटनने सिरीयन मुसलमान शरणार्थींसाठी आपली दारे सताड उघडली आहेत. सीरियन शरणार्थींचे सोंग घेऊन अनेक आफ्रिकन देशातले मुसलमान देखील ब्रिटनमध्ये घुसले आहेत.ब्रिटनची ब्रॅडफोर्ड, लिसेस्टर ही शहरे लक्षणीय मुसलमान लोकसंख्येने व्यापली आहेत. तिथल्या मुसलमान वस्त्यांमध्ये ब्रिटिश पोलीस सुद्धा आत शिरू शकत नाहीत अशी दुरावस्था आहे. काही वस्त्यांमध्ये अगदी फलकांद्वारे येथे शरिया कायदा चालतो अशी तंबी ब्रिटनला देण्यात आली आहे.लंडन महानगराचे महापौर एक मुसलमान व्यक्ती निवडून येतो ही धोक्याची घंटा देखील ब्रिटिशांना ऐकू येत नाही.आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन हिंदू मुसलमान या धर्माच्या नावावर करणाऱ्या ब्रिटनच्या नशिबी येत्या एक दोन दशकात मुस्लिम बहुल राष्ट्र होण्याचा संभव हा नियतीने ब्रिटनवर उगवलेला सूड असेल.

१६ व्या शतकात प्रोटेस्टंट (protestant) हा एक सुधारणावादी पंथ उदयास आला तो धर्मांध रोमन कॅथलिक आणि पर्यायाने पोपच्या वर्चस्ववादी व्यवस्थेला विरोध करण्यासाठीच. ब्रिटनच्या (british) राज्यकारभारात देखील रोमन कॅथलिक व्हॅटिकनने नको तितका धुडगूस घातला होता. शेवटी ब्रिटिश राजाने प्रोटेस्टंट पंथ स्वीकारला आणि चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. या नंतर देखील इव्हानजिकल, रिफॉर्मिस्ट या सारखे पंथ उदयास आले आहेत. आपला राजवंश आणि राज घराणे हे प्रोटेस्ट पंथाशी एकनिष्ठ असल्याची पुरेपूर काळजी आजपर्यंत ब्रिटन घेत होते. मात्र नजीकच्या भविष्यात इंग्लंडच्या राजगादीवर एखादा पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नवाब बसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

या उलट भारताच्या जवळ ज्ञान, परंपरा, आचार-विचार, जनसंवाद आणि शास्त्र यांसारखी अत्यंत महत्त्वपूर्ण परंपरा आहे. अनेक वर्षांपासून भारताने बिघडलेल्या स्थितीचा सामना केला आणि राजनैतिक, तसेच सामाजिक र्‍हासाच्या शिकारीस तो बळी पडला. ज्याचा प्रभाव सामाजिक आणि धार्मिक मूल्यांसह भारताची ज्ञानपरंपरा विद्या अन् अर्थव्यवस्थेवरही पडला; परंतु आमचा राष्ट्रीय मानस, धार्मिकता, आस्था, विश्वास, राजनीती आणि प्रशासन व्यवस्था अशा स्थितीतही लागोपाठ अक्षुण्ण बनत आहे; कारण भारतीय संस्कृतीने आम्हा करोडो भारतियांना सहस्रो वर्षांपासून एका सूत्राने बांधून ठेवले आहे. संस्कृती नेहमी जोडण्याचे काम करते. भारतीय संस्कृतीमध्ये तर हा गुण अपार आणि अथांग आहे.

ब्रिटनच्या राज घराण्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणारा ब्रिटनचा पंतप्रधान आणि आज देखील बायबल वर हात ठेवून राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, आम्हाला कुठल्या तोंडाने संविधान शिकवतात हेच कळत नाही. हे दुट्टपी धोरण आता थांबवून स्वतःच्या देशात काय सुरु आहे ते पहा नाहीतर हे मुसलमान निर्वासित, शरणार्थी, घुसखोर तुम्हाला तुमच्याच देशात शरणार्थी बनवतील…

Back to top button