IslamNews

मिठू मियां ला नको दया माया

‘मी हिंदू मुलींना मुस्लीम करण्याच्या मोहिमेवर, पूर्वजांनीही तेचं केलं, मुलंही हेचं करतील’:-मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठू

ब्रिटन सरकारने शुक्रवारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील या धर्मांध मुस्लिम धर्मगुरूवर निर्बंध घातले आहेत,

मियां अब्दुल हक (मियां मिठू) या मुस्लिम धर्मगुरूवर ब्रिटन मध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढे मिया मिठूला ब्रिटनमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच ब्रिटन मधील त्याची बँकेतली खाती व इतर मालमत्ताही गोठवण्यात आली आहे. कारण मियां मिठू हा “धार्मिक अल्पसंख्याक अर्थात बहुतांशी हिंदू मुली आणि महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांच्या मुसलमानांसोबतच्या विवाहासाठी जबाबदार आहे”, यूकेचे परराष्ट्र सचिव जेम्स यांनी ही माहिती दिली.

मियां अब्दुल हा घोटकी, सिंधमधील भरचुंडी शरीफ दर्ग्याचा मौलवी आहे.सिंध आणि संपूर्ण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच अल्पसंख्याकांसाठी नर्कच आहे.आता पर्यंत हजारो हिंदू स्त्रिया आणि मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर झाले आहे. दर्गा भरचुंडी शरीफ धर्मांतराचा अड्डा बनला आहे. मियां अब्दुल सक्रियपणे हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यास धर्मांधांना प्रोत्साहित करतो, त्यांचे जबरदस्तीने विवाह लावून देतो. यातील लक्षणीय संख्येतील हिंदू मुली या अल्पवयीन आहेत. त्याला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान व तेथील धर्मांध शक्ती पाठीशी घालत आहे. 2019 च्या घोटकी दंगलीत मियां मिठूचा सक्रिय सहभागी होता, तरीही इस्लामिक रीपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, ” इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जगातील सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक आहे.अण्वस्त्र बाळगणारा तो एक अतिशय बेजबाबदार देश आहे.”

फाळणीच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के होती. पण 2017 च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमधील 96.28 टक्के लोक आता मुस्लीम धर्मीय असून फक्त 3.72 टक्के अल्पसंख्याक किंवा गैरमुस्लीम या देशात उरले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, पाकिस्तानात धर्मांध इस्लामिक कट्टरतावादाचा जोरही वाढला आहे आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे अल्पसंख्याकांवर सातत्याने होणारे क्रूर अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या घटनादेखील झपाट्याने वाढलेल्या आहेत.

1951च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानात 12.9 टक्के हिंदू धर्मीय वास्तव्यास होते.पण,आता या देशात फक्त 1.6 टक्के हिंदू उरले आहेत. अल्पसंख्याकांची सतत घटणारी लोकसंख्या पाकिस्तानातील त्यांच्या परिस्थितीचे भयावह चित्रच मांडते. कट्टरतावादी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान एकीकडे धार्मिक उन्मादापोटी हिंदूंची स्थळे उद्ध्वस्त करत आहे आणि प्राचीन ऐतिहासिक वारसा नष्ट करत आहे. हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने केलेले धर्मांतर म्हणजे हिंदूंचा वंश वाढू न देण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या धार्मिक छळाला कंटाळून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील अनेक हिंदूंनी भारतात स्थलांतर केले आहे.

https://www.bbc.com/marathi/international-63268995

भारतात देखील नासक्या विचाराचे धर्मांध मुस्लिम मौलवी मोठ्याप्रमाणावर सक्तीचे धर्मांतरण करत आहेत. आपल्याला औरंगाबादेत नुकतीच घडलेली घटना आठवत असेलच, इस्लाम मध्ये धर्मांतर करण्याच्या हेतूने अनुसूचित जाती (बौद्ध) समाजातील युवक दीपक सोनवणे या इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या युवकाला मारहाण, आर्थिक फसवणूक, छळ करून त्याची सुंता केली गेली… MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत व जलील यांच्या घरासमोर त्यांच्याच सांगण्यावरून त्यांच्या माणसांनी दीपक सोनवणे जबर मारहाण केली गेली. एका हिंदू मुलाला असे दहशतीने वागवत असतील तर कचाट्यात सापडलेल्या हिंदू मुलीला कसे वागवत असतील देवास ठाऊक ?

येऊ घातलेल्या “द केरला स्टोरी” या सिनेमामुळे धर्मांध इस्लामचा खरा चेहरा उजेडात आला आहे. आपल्या सुखी समृद्ध भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या भोळ्याभाबड्या हिंदू तरुणींना मुसलमान तरुण अगदी ठरवून योजनाबद्ध रीतीने प्रेमाच्या जाळ्यात ओढतात… मुलाच्या बाजूने त्यात प्रेम वगैरे काही नसतं… असतं ते फक्त ISIS साठी काफिर महिला दहशतवाद्यांची भरती करण्याचे षडयंत्र… या षडयंत्राचा सुगावा लागेपर्यंत खूप उशीर झालेला असतो… परतीचे दोर कापले गेलेले असतात… हाती उरतं ते फक्त वाट्याला आलेले भोग निमूटपणे भोगण्याचे असहाय्य जीवन… आणि हे षडयंत्र केरळात अगदी खुलेआम दिवसाढवळ्या बेधडक सुरू आहे… याला कोणीही थांबू शकत नाही का? असा काळीज चिरणारा टाहो शालिनीने आपल्या त्या ३२ हजार अभागी केरळी हिंदू भगिनींच्या वतीने, अफगाणिस्तानच्या तुरुंगातून फोडला आहे…

धर्मांध मुसलमानांची विखारी मानसिकता संपूर्ण जगात एकसारखीच आहे मग राष्ट्रद्रोही जाकीर नाईक असो की मियां मिठू वा कारस्थानी जलील… मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्य होतात तेथे संविधानाला झुगारून शरिया लागू करण्याचा प्रयत्न करतात. जाकीर नाईक सारखे राष्ट्रद्रोही परदेशात राहून त्याला खतपाणी घालतात. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे मोठया-प्रमाणात इस्लामी धर्मांधता पसरवली जात आहे, तरुणांच्या मनात विखार पसरवला जात आहे. लव्ह-जिहाद, लँड-जिहाद अशी षडयंत्रे नित्यनियमाने आपल्या देशात बघायला मिळत आहे.

या षडयंत्रकारी धर्मांधते विरोधात, हिंदू समाजाने सुप्त अवस्थेतून जागे होऊन पांचजन्य फुकण्याची वेळ आली आहे.

ब्रिटनने उचललेले पाऊल स्वागतार्हच आहे पण एका मियां मिठूवर निर्बंध घालून काही होणार नाही. ज्यांच्या जोरावर तो हे नीच षडयंत्र चालवतो आहे त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला युनायटेड नेशन्सने आतंकवादी देश जाहीर करावे लागेल.

भारत माता की जय ..

https://www.mahamtb.com//Encyc/2022/9/29/Article-on-Pakistan.html

Back to top button