Newsकोकण प्रान्त

दिव्यांग धारा प्रतिष्ठान आणि संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने संवादसेतू नाट्य स्पर्धा २०२२च्या बक्षीस वितरण समारंभाची दिमाखात सांगता

दिव्यांग आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा उत्सव


जागतिक अपंग दिनानिमित्ताने ( International Day of Persons with Disabilities)आयोजित केलेल्या संवादसेतू नाट्य स्पर्धा २०२२ यशस्वीपणे पार पडल्या आणि त्याचा पारितोषिक वितरण समारोह स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी ७ जानेवारी २०२३ रोजी उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाचा आधारवड म्हणावयास हवे असे, विशेष अतिथी आमदार एडव्होकेट श्री आशिषजी शेलार , भाजप मुंबई अध्यक्ष हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई , घाटकोपर गॅलेक्सी यांचा विशेष सहयोग या प्रकल्पाला होता. या क्लबच्या श्रीमती पद्मा राममूर्थी जी आणि अन्य सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उद्बोधन करताना योगेशजी सोमण..

त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून श्री योगेशजी सोमण , संचालक अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ,हे उपस्थित होते आणि त्यांनी दिव्यांग आणि नाटक, नाटक आणि संवाद, नवीन राष्ट्रीय शिक्षण प्रणाली आणि दिव्यांग याबाबत आपले विचार स्पष्ट केले.त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे सहकार्यवाह मुंबई महानगर चे श्री संजयजी माळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्रीम. मंजिरी ताई मराठे (सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा, श्री. आशुतोष गोखले (प्रसिद्ध युवा अभिनेता ), श्री. योगेशजी सोमण आणि श्रीम. पद्मा राममूर्थी (लायन्स क्लब मुंबई घाटकोपर गॅलॅक्सी च्या पदस्थ )
काशिनाथ घाणेकर ठाणे येथे स्पर्धेचे उदघाटन करताना..

विशेष निमंत्रित म्हणून श्रीयुत आशुतोष गोखले हे प्रसिद्ध युवा अभिनेते यावेळी आपले हजेरी लावून आणि मुलांना जीव लावून गेले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष श्रीमती मंजिरी मराठे यांचाही सहभाग आवर्जून या कार्यक्रमाला होता. सर्व परीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून कलावंत,नाट्यात निपुण असे श्री वैभवजी निमकर यांनी मार्गदर्शनपर शब्द विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगितले, तसेच भविष्यातील काही योजनांविषयी आपले विचार मांडले. दादर, ठाणे , डोंबिवली , नाशिक या चार ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात या नाट्य स्पर्धा घेतल्या गेल्या. संस्कार भारतीचे तसेच काही अन्य कलाकार व विशेष शिक्षक यांच्यातर्फे नाटकांचे परीक्षण झाले व बक्षिसांची निवड झाली.एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.
८ ते १८ हा वयोगट या स्पर्धेसाठी घोषित केला होता. अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थ्यांनी, नाट्यकृती, नृत्य-नाट्य,एकपात्री प्रयोग करणे अपेक्षित होते. विद्यार्थी तसेच पालकांसाठीही ही स्पर्धा आयोजित केली होती. एकूण २२ शैक्षणिक संस्थांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये दिव्यांगांच्या व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या संस्थांचा अंतर्भाव होता. कर्णबधिर,मतिमंद (शाळा व कार्यशाळा) अंध, अनाथाश्रम व सर्वसामान्य शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी अशा ५ प्रवर्गांनी या स्पर्धेत भाग घेतला.
संवाद चमत्कार घडवतो किंवा घडवू शकतो .

संवादाचे स्वरूप सहज पण हेतू पुरस्सर असावा ,विचार करण्यास प्रवृत्त करणारा संवाद असावा. प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच नसावेत. उत्तरे,गर्भित अर्थ कल्पनेला ताण, काही गोष्टींचे संदर्भ, विद्यार्थ्याला काय समजलं?याचा अंदाज घेणारे चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली, धड्यामागील लेखकाचा हेतू काय असेल? कोणत्या काळातली, वातावरणातली ही घटना असेल. थोडक्यात नाट्य आणि संवाद , संवाद आणि माणसाचा वैचारिक भावनिक,सामाजिक विकास एकमेकांना पूरक आहे याचं प्रत्यंतर या नाट्यकृती बसवताना व बघताना आलं.

स्पर्धेचे निकष:-

१. आवश्यक रंगभूषा आणि नेपथ्य.
२. नेपथ्याचा नाटक करताना योग्य वापर.
३.भूमिकेला साजेसा पोशाख
४. गटामधील सांघिक वृत्ती
५. संवादाची आवड
६. संपर्क पद्धती आणि त्यांचा योग्य वापर. बोली, लेखी, नैसर्गिक खुणा, साइन ची भाषा
७. अभिनय (चेहेऱ्यावरील व देहबोली )
८. पात्राचे परस्परां मधील अभिनय, सादप्रतिसाद… क्रिया प्रतिक्रिया.
९. मूळ धडा कविता ह्यात स्वभाविक पणे केलेला बदल. सराव करतांना, प्रत्यक्ष नाटक बसवताना अर्थबोधासाठी, काही पात्र धड्यातील संभाषणात नसतात पण ती गृहीत असतात. ( उदा :पात्र वाढवणे, शेवट वाढवणे)
१०. नाटकाचे सुरुवातीचे निवेदन व शेवट त्यातून काय बोध झाला. हे सांगणे.
११. नाटुकल्याचा प्रेक्षकांवर झालेला परिणाम.

नाट्य स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-

संवादसेतू नाट्यस्पर्धा निकाल.
कर्णबधिर स्तर

प्रथम क्रमांक
विकास मंदिर कर्णबधिरांची शाळा नाशिक – पर्यावरण
आणि
प्रगती विद्यालय दादर – कर्तव्य

द्वितीय क्रमांक
रोटरी स्कूल फॉर द डेफ, डोंबिवली- तळ्याची गोष्ट

तृतीय क्रमांक
कमलिनी विद्यालय ठाणे – बलिदान

उत्तेजनार्थ
रोटरी स्कूल फॉर द डेफ- इंधन बचत

मतिमंद शाळा

प्रथम क्रमांक
जिद्द – एक पाऊल स्वावलंबनाकडे

द्वितीय क्रमांक
शिरोडकर स्कूल- महाराष्ट्र ग्रुप डान्स – परेल
आणि
मीरा विद्यालय – परोपकार-माटुंगा

मतिमंद कार्यशाळा

प्रथम क्रमांक
जागृती – जागृतीचा दिवा- ठाणे

द्वितीय क्रमांक
आव्हान – स्वच्छता अभियान- दादर

सर्वसामान्य विद्यार्थी आणि अनाथ आश्रम

लहान गट

प्रथम क्रमांक
जीवन संवर्धन- ठाणे – देवाची माळ

द्वितीय क्रमांक
बालमोहन प्राथमिक स्तर -दादर
पाणी किती खोल

उत्तेजनार्थ
पी ई एस महाराष्ट्र हायस्कूल- मुक्या प्राण्याची कैफियत

मोठा गट
स्किझोफेनिया तुफान – कीर्ती कॉलेज- दादर

उत्तेजनार्थ
जीवन संवर्धन टिटवाळा – व्यायामाचे महत्त्व
आणि
श्रद्धानंद महिलाश्रम – माटुंगा -अंधेर नगरी

नृत्य नाट्य स्पर्धा
१)बालमोहन शाळा प्राथमिक स्तर – दख्खनची राणी
२) पडसाद स्कूल फॉर द डेफ – नाशिक- अगबाई ढगबाई
३) कीर्ती कॉलेज- गीत रामायण

एकपात्री प्रयोग स्पर्धा निकाल

मतिमंद विभाग
१ मयुरी देशमुख
२ सुवर्णा जाधव
३ रिया कोळी

उत्तेजनार्थ
भावना काळे
अभिजीत

एकपात्री प्रयोग स्पर्धा सर्वसामान्य विद्यार्थी

लहान गट
१ सुयश पवार
२ सान्वी जाधव
३ इरावती वालावलकर

उत्तेजनार्थ
शांभवी बडवे

माध्यमिक गट
१ मुग्धा शेलार

उत्तेजनार्थ
भाग्यश्री भिसे

विशेष पारितोषिक(परीक्षकांकडून)
कार्तिक धायगुडे

समारंभात खालील संस्थांची सादरीकरणे
१ अंध युवा सिद्धेश यांचे तंतुवाद्य
२ आव्हान पालक संघ
३ मी स्वातंत्र्यवीर
सावरकर – बालमोहन विद्यामंदिर
४ हलगी नृत्य – कमला मेहता अंधशाळा – परेल
५ व्यायामाचे महत्व- जीवन संवर्धन टिटवाळा
६ पर्यावरण- विकास मंदिर नाशिक
७ तळ्याची गोष्ट- रोटरी स्कूल फॉर द डेफ डोंबिवली.
त्याचप्रमाणे उत्तम अभिनय, निवेदन आणि छान वाचा ह्यासाठी एकूण २२ वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली….

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग धारा प्रतिष्ठानच्या शुभदा ओक सातपुते आणि संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन केले होते.

पालक, शिक्षक, मुख्याध्यापक,संस्थाचालक, कीर्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिवांगी वालावलकर(क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि कीर्ती महाविद्यालयातील प्राध्यापिका ) ह्यांच्या सहभागानी आणि सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला. तसेच भाजप दादर-माहीम विधानसभा, (महिला आघाडी) यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

https::://drive.google.com/drive//folders/186s4MQxC4TQEDoUZq-uemJPkSjVktbXsk

Back to top button