Newsकोकण प्रान्त

वनवासी कल्याण आश्रम ,मुंबई महानगर दिनदर्शिका प्रकाशन.

vanvasi kalyan ashram calendar

१९९९ साली वनवासी कल्याण आश्रमाची दिनदर्शिका (vanvasi kalyan ashram calendar) काढण्यास सुरुवात झाली. दिनदर्शिका छापण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आश्रमाचे कार्य घरोघरी पोहचवणे हा आहे.श्री.ओवळेकर, श्री.कोपरकर व त्यांच्या सोबतचे इतर कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका छापण्याचे ठरले.आणि गेली २६ वर्षे ही संकल्पना कार्यकर्त्यांची सर्व टीम पुढे राबवत आहेत.सर्व कार्यकर्ते आपले तन,मन,धन अर्पून जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिनदर्शिका पोहचेल या साठी प्रयत्न करीत आहेत.

दरवर्षी एक विषय घेऊन दिनदर्शिकेच्या मागच्या पानावर विशेष लेख छापले जातात. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे झाली याचे औचित्य साधून महाराजांचे अज्ञात वीर मावळे यांची ओळख लेखांमधून करुन दिली आहे.हे लेख श्री.महेश गुप्ते व श्री.रामदास खरे लिखीत पुस्तकांमधून संकलीत केले आहेत.याच बरोबर राशी भविष्य, पंचांग, शुभदिवस, शुभकार्यासाठी मुहुर्त ,संस्थेचे कार्यवृत्त,संस्थेतर्फे चालवले जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती इत्यादी माहिती दिली आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका सर्वांग सुंदर व वाचनीय झाली आहे.

या वर्षी दि.१ आक्टोबर २०२३ रविवार रोजी वनवासी कल्याण आश्रम मुंबई महानगराचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ आनंदात व उत्साहात रामभाऊ म्हाळगी सभागृहात संपन्न झाला. श्री.मुकुंदराव चितळे,श्री.भूषणजी वाधवनी,सौ.शुभांगीताई कडगंचे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.मीनल गवाणकर यांनी सांघिक गीत घेतले.सुनिता आंबुर्ले यांनी दिनदर्शिके विषयी माहिती सांगितली.

प्रमुख वक्ते वनवासी कल्याण आश्रम ,मुंबई महानगराचे अध्यक्ष मा. मुकुंदराव चितळे यांनी आपल्या खुमासदर शैलीत कार्यकर्त्यांना ऊद्बोधीत केले.त्यांनी आपले विचार मांडतांना कार्यकर्त्यांनी दिनदर्शिकेतील मागील पानावरिल लेख स्वतः वाचावे व ज्यांच्यापर्यंत आपण दिनदर्शिका पोहचवणार त्यांना त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे सांगून दिनदर्शिका वाचण्या उद्युक्त करावे तरच लेख छापण्याचा उद्देश सफल होईल असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अविनाश सात्विक यांनी केले.कार्यक्रमास ५० कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखिका :- सुनिता आंबुर्ले

(वनवासी कल्याण आश्रम मुंबई महानगर सहसचिव.)

Back to top button